शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

VIDEO- आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच लाँच

By admin | Updated: September 7, 2016 23:18 IST

आयफोन 7 सोबतच अ‍ॅपल आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2 या दोन फोनचं लाँचिंग झालं आहे.

ऑनलाइन लोकमतसन फ्रान्सिस्को, दि. 7 - अ‍ॅपलचा बहुप्रतीक्षित आयफोन 7 आज लाँच झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपलच्या आयफोन 7 संदर्भातील अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर आयफोन 7चा व्हिडीओही जबरदस्त व्हायरल होऊन लोकांच्या पसंतीस उतरला आहे. अ‍ॅपलचा हा आयफोन 7 म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील नवी क्रांती असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. आयफोन 7 सोबतच अ‍ॅपल आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2 या दोन फोनचं लाँचिंग झालं आहे. मात्र सर्व फोनपैकी अ‍ॅपल 7 या फोन लोकांच्या केंद्रस्थानी आहे.आयफोन 7ची स्क्रीन साईज 4.7 इंच, तर आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2 हँडसेटची स्क्रीन 5.5 इंच आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही आयफोन थ्रीडी टच आहेत. या हँडसेट्सच्या 32 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 53 हजार रुपये आहे. तर 64 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 61 हजार रुपये आणि 256 जीबीच्या आयफोनची किंमत 71 हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्याचसोबत 32 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 61 हजार रुपये, 128 जीबीच्या आयफोन 7 प्लसची 69 हजार आणि 256 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 79 हजार रुपयांच्या जवळपास आहे. अ‍ॅपल कंपनीच्या या तिन्ही आगामी हँडसेट्समध्ये ए10 प्रोसेसरसोबत बसवण्यात आले आहेत.आयफोन 7 मध्ये 2 जीबी रॅम, आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. अ‍ॅपल प्लस आणि अ‍ॅपल वॉच 2 मध्ये एकाच प्रकारचे सीपीयूचा वापर केला असून, क्लॉक स्पीडही आधीच्या आयफोनपेक्षा अधिक आहे. अ‍ॅपलचे हे सर्व आयफोन वॉटर रेसिस्टंट आहेत. तर आयफोनमध्ये स्टिरीओ स्पीकरही उत्तम प्रतीचे देण्यात आले आहेत. या सर्व आयफोनमध्ये हेडफोन जॅकच्या त्याऐवजी नवीन लाइटनिंग पोर्ट देण्यात आलं आहे. त्याद्वारेच एअरफोन कनेक्ट होणार आहे. हे सर्व फोन वायरलेस पद्धतीनं चार्ज करता येणार आहेत. आयफोन 7ची वैशिष्ट्येआयफोन 7ला 4.7 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच आयफोन 7मध्ये हेडफोन जॅकची सुविधा देण्यात आली नसून वायरलेस हेडफोननेच आयफोन 7 कनेक्ट होणार आहे. आयफोन 7मध्ये सुधारित 12 मेगा पिक्सलचा कॅमेरा बसवण्यात आला असून, कमी प्रकाशातही चांगली स्पष्टता देणार आहे. यात ड्युएल लेन्स कॅमेरा बसवण्यात आला आहे. आयफोन 7मध्ये सर्वाधिक जलद चालणारी नवीन ए10 चिफ बसवण्यात आली असून, 3 जीबीचा रॅम देण्यात आला आहे. तसेच 2.37GHZ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या अनुषंगानं सेन्सिटीव्ही होम बटण देण्यात आलं आहे. त्यामुळे हा फोन ऑपरेटिंग करताना सुपरफास्ट चालणार आहे. या आयफोन 16 जीबीची किंमत 43 हजारांच्या घरात आहे. तर 32 जीबीच्या आयफोन 7ची किंमत 53 हजारांपर्यंत असणार आहे. सॅमसंगनं गॅलक्सी 7चे स्मार्टफोन फोन मागवले परतसॅमसंगनं जवळपास 2.5 मिलियन म्हणजेच 25 लाखांच्या घरात गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोन परत मागवले आहेत. गॅलक्सी 7च्या अधिकतर स्मार्टफोनमध्ये सदोष बॅटरी असल्यानं स्फोट होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर सॅमसंग कंपनीनं गॅलक्सी 7चे फोन परत मागवले आहेत. मात्र त्याच वेळी अ‍ॅपलनं आयफोन 7 लाँच केल्यानं सॅमसंगला हा जबरदस्त धक्का मानला जात आहे.