शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अतिशय यशस्वी मोहीम - ट्रम्प

By admin | Updated: April 14, 2017 05:41 IST

अफगाणच्या इसिसबहुल भागावर हा बॉम्ब टाकण्याचे सर्वाधिकार मीच लष्कराला बहाल केले होते, असे सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अतिशय

वॉशिंग्टन : अफगाणच्या इसिसबहुल भागावर हा बॉम्ब टाकण्याचे सर्वाधिकार मीच लष्कराला बहाल केले होते, असे सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अतिशय यशस्वी मोहीम ठरली असल्याचा दावा केला आहे. या कामगिरीबद्दल मला माझ्या सैनिकांचा खरोखरच अभिमान आहे. प्रत्येकाला माहीत आहे की काय झाले आहे. जगातील सर्वांत श्रेष्ठ लष्कर आमच्याकडे आहे आणि त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मी त्यांना सर्वाधिकार बहाल केले होते. मोकळेपणाने सांगायचे तर हे काम आम्ही खूप आधीच करायला पाहिजे होते. तुम्ही मागील आठ आठवड्यांत काय घडले, हे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, हे मागील आठ वर्षांतच घडायला पाहिजे होते. आता तुम्हाला आमूलाग्र बदल दिसेल. यातून उत्तर कोरियाने काय संदेश घेतला असेल ते मला माहीत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.अमेरिकन लष्कर (अफगाण)चे कमांडर जनरल जॉन डब्ल्यू. निकोलसन यांनी सांगितले की, इसिस त्यांच्या बचावासाठी आयईडी, बंकर्स, गुहा वापरत होती. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. ननगरहार हा इसिसचा गड मानला जातो. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात इसिसचे सुमारे ६००-८०० अतिरेकी वास्तव्य करतात. नेमक्या याच भागावर महाबॉम्ब टाकण्यात आला.