शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

व्हेनेझुएला: पोलीस आणि कैंद्यांमध्ये तुंबळ हाणामारी, 37 कैद्यांचा मृत्यू तर 14 पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 14:59 IST

राजकीय अशांतता असलेल्या व्हेनेझुएलाच्या दक्षिणेकडूल एमेजोनस राज्यातील एका तुरूंगात पोलीस आणि कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

ठळक मुद्दे राजकीय अशांतता असलेल्या व्हेनेझुएलाच्या दक्षिणेकडूल एमेजोनस राज्यातील एका तुरूंगात पोलीस आणि कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

काराकास, दि. 17 -  राजकीय अशांतता असलेल्या व्हेनेझुएलाच्या दक्षिणेकडूल एमेजोनस राज्यातील एका तुरूंगात पोलीस आणि कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्ये 37 कैद्यांचा मृत्यू झाला असून 14 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. अॅटॉर्नी जनरल कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. न्यायालयीन प्रतिबंध केंद्रात एका कारवाईदरम्यान ही घटना घडली. 

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांचे विरोधी अॅटॉर्नी गुआरुला यांनी या घटनेवर टीका केली आहे. गृह मंत्रालयाने जेलमध्ये 'जनसंहार' घडवला असं ते म्हणाले आहेत. व्हेनेझुएलात तुरूंगात झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हिंसाचार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.घटनेच्या वेळी तुरूंगात 105 कैदी होते अशी माहिती आहे, त्यापैकी 37 जणांचा मृत्यू झाला आहे.  

व्हेनेझुएलाची स्थिती का बिघडली?-

तेलाच्या बळावर व्हेनेझुएलाला ताठ मानेने चालण्यास मदत करणाऱ्या ह्युगो चॅवेझ यांच्या निधनानंतर व्हेनेझुएलाची राजकीय, सामाजिक स्थिती चांगलीच बिघडली आहे. तेलाच्या घटत्या किमती आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांच्याविरोधात असणाऱ्या तीव्र असंतोषामुळे सगळ्या घडी विस्कटली आहे. बेसुमार चलनवाढ, वाढती बेरोजगारी यामुळे व्हेनेझुएलामध्ये दररोज सरकारविरोधात निदर्शने आणि आंदोलने हे रोजचेच चित्र बनले आहे. अमेरिकेने तर मडुरो हे हुकुमशहा असल्याचं सांगत त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. बेकायदेशीरपणे निवडणुका घेतल्याने अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने वाटचाल करणाऱ्या व्हेनेझुएलाचे अंतर्गत राजकारण, वाढती महागाई, बेसुमार वाढलेली बेकारी आणि असंतोषामुळे कंबरडे मोडले आहे. काही वर्षांपुर्वीपर्यंत व्हेनेझुएलाचे नाव स्वबळावर कसे उभे राहावे याचे उदाहरण देण्यासाठी घेतले जात असे, आज हे चित्र पूर्णतः बदलून गेले आहे.

    व्हेनेझुएलातील निवडणुकांना बेकायदेशीर ठरवून विरोधी पक्षांनी 48 तासांचा बंद पुकारला आहे. यावेळेस झालेल्या पोलीस आणि निदर्शकांच्या झटापटीत पाच लोकांचे प्राण गेले आहेत. नव्या असेम्ब्लीच्या स्थापनेसाठी मडुरो यांनी निवडणुका जाहीर केल्या आणि रविवारी 30 जुलै रोजी त्यांनी त्यासाठी मतदानही घेतले. या निर्णयामुळे मडुरो यांना अमर्याद अधिकार प्राप्त होणार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी या निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे. तर मडुरो यांनी दडपशाहीचे हत्यार आता वेगाने वापरायला सुरुवात केली आहे. वादग्रस्त निवडणुकीच्या मतदानानंतर लिओपाल्डो लोपेझ आणि अॅंटोनियो लेडझ्मा या विरोधीपक्षातील नेत्यांना सरळ उचलून कारागृहात टाकण्यात आले. या दोन्ही नेत्यांनी राजधानी कॅराकसचे महापौरपद भूषविलेले आहे.

बेसुमार चलनवाढीची अर्थव्यवस्थेला धोकाव्हेनेझुएलाच्या नॅशनल असेम्ब्लीच्या फायनान्स अॅंड डेव्हलपमेंट कमिशनच्या अहवालानुसार या वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हेनेझुएलाची चलनवाढ 679.73 टक्क्यांवर जाऊन पोहोचेल. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने याहून धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे, नाणेनिधीच्या अहवालात यावर्षी 720 टक्के चलनवाढ दिसून येईल अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्यामुळे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला आहे. यामुळे बेकारीचे प्रमाण वाढले असून समाजातील विविध घटकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. उपासमार आणि वस्तूंची कमतरता यामुळे सरकारविरोधात कॅराकसमध्ये दररोज निदर्शने केली जातात. ह्युगो चॅवेझ यांचे राजकीय वारसदार म्हणून सत्तेवर बसलेल्या मडुरो यांच्याविरोधात विरोधीपक्षाने आणि नागरिकांनी आवाज उठवला आहे. मडुरो हे हुकुमशहा असून विरोधकांचा आणि लोकांचा आवाज दडपतात असा आरोप त्यांच्यावर केला जातो. तर या सगळ्यामागे अमेरिकेसह परकीय सत्तांचा हात असल्याचा आरोप मडुरो यांनी केला आहे.

मडुरो- बस ड्रायव्हर ते राष्ट्राध्यक्षआज व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदावर बसलेले निकोलस मडुरो एकेकाळी राजधानी कॅराकसमध्ये बस चालवण्याचे काम करत असत. कामगार संघटनांच्या चळवळीतून त्यांनी नाव कमवायला सुरुवात केली. त्यामुळे ते राष्ट्रध्यक्ष ह्युगो चॅवेझ यांच्या नजरेत भरले. त्यानंतर त्यांनी हळूहळू चावेझ यांच्या विश्वासू लोकांच्या गटामध्ये प्रवेश करुन महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. नंतर चॅवेझ यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहा वर्षे परराष्ट्र खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. ह्युगो चॅवेझ यांनी त्यांना उपराष्ट्रपतीही बनवले. चॅवेझ यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर सत्तेचा ताबा मडुरो यांच्याकडे आला. 2013 साली झालेल्या निवडणुकीत मडुरो यांचा अगदी अल्प फरकाने विजय झाला. चॅवेझ यांचे वारसदार म्हणून जरी त्यांना सत्ता सोपवली गेली असली तरी मडुरो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलेले नाहीत. तेलाचे दर घसरल्यामुळे अर्थव्यवस्था कोसळलीच त्याचप्रमाणे मडुरोंच्या दडपशाहीमुळे परिस्थिती चिघळत गेली. 2013 च्या तुलनेत व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेचा आकार 23 टक्क्यांनी कमी होईल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पष्ट केले आहे.