शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या व्हिसावर निर्बंध

By admin | Updated: July 10, 2016 02:27 IST

अमेरिकी संसद सदस्यांच्या द्विपक्षीय गटाने प्रतिनिधी सभेत एक विधेयक सादर केले असून ते संमत झाल्यास भारतीय कंपन्यांना एच-१बी आणि एल- १ व्हिसावर माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांची

वॉशिंग्टन : अमेरिकी संसद सदस्यांच्या द्विपक्षीय गटाने प्रतिनिधी सभेत एक विधेयक सादर केले असून ते संमत झाल्यास भारतीय कंपन्यांना एच-१बी आणि एल- १ व्हिसावर माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांची भरती करता येणार नाही. एच-१बी व्हिसाच या कंपन्यांच्या उत्पन्नाचा पाया असून तो खचल्यास त्यांचा आर्थिक डोलारा कोसळू शकतो.डेमोक्रॅटिक पक्षाचे न्यूजर्सी येथील काँग्रेस सदस्य बिल पास्क्रेल व रिपब्लिकनचे कॅलिफोर्नियातील संसद सदस्य डाना रोहरबाचेर यांनी ‘एच-१ बी आणि एल -१ व्हिसा सुधारणा कायदा २०१६ हे विधेयक सादर केले आहे. ते संमत झाले तर भारतीय कंपन्यांना एच-१ बी व एल १ व्हिसावर ५० हून अधिक किंवा ५० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास मनाई असेल. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वाक्षरीने कायद्यात रुपांतरित होण्यापूर्वी हे विधेयक सिनेटने संमत करणे आवश्यक आहे. तथापि, हे विधेयक अद्याप मांडण्यात आलेले नाही. या संसद सदस्यांनी २०१० मध्येही अशाच स्वरूपाचे विधेयक मांडले होते. मात्र, त्याला पुरेसा पाठिंबा मिळाला नव्हता. हे विधेयक एच-१ बी व एल-१ व्हिसातील पळवाटा बंद करेल, असा या दोघांचा दावा आहे. (वृत्तसंस्था)व्यावसायिक गणित कोलमडणारमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कंपन्यांच्या सर्व डोलारा एच-१ बी आणि एल-१ व्हिसावरच आधारलेला आहे. हे विधेयक संमत झाल्यास त्यांचे व्यावसायिक गणित कोलमडेल. या व्हिसा विधेयकाचे समर्थक संसद सदस्य भारतीय अमेरिकी नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्याला असलेल्या कॅलिफोर्निया व न्यू जसीचे प्रतिनिधीत्व करतात.