शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

US Visa: अतिरिक्त शुल्क भरून अमेरिकेच्या व्हिसासाठी आधी अपॉईंटमेंट मिळू शकते का? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 15:48 IST

सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत अपॉईंमेंटचे स्लॉट्स हळूहळू उघडत आहेत. व्हिसा अपॉईंटमेंटसाठी असलेल्या मागण्यांच्या तुलनेत सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन दिल्या अपॉईंटमेंट्स कमी आहेत याची आम्हाला जाणीव आहे.

प्रश्न: अतिरिक्त शुल्क भरून मला व्हिसासाठी आधी अपॉईंटमेंट मिळू शकते का? 

उत्तर: शुल्क भरून व्हिसासाठी अपॉईंटमेंट देण्याचं वचन किंवा विनंती हा घोटाळा आहे. अमेरिकेच्या दुतावासाशी त्याचा कोणताही संबंध नाही.

सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत अपॉईंमेंटचे स्लॉट्स हळूहळू उघडत आहेत. व्हिसा अपॉईंटमेंटसाठी असलेल्या मागण्यांच्या तुलनेत सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन दिल्या अपॉईंटमेंट्स कमी आहेत याची आम्हाला जाणीव आहे. लवकर अपॉईंटमेंट निश्चित करण्याचं वचन देऊन फसवणूक करणारे सक्रीय असल्याची आम्हाला कल्पना आहे. हे लोक व्हिसा अपॉईंटमेंटसाठी साधारणत: ७ हजार १२५ ते ३० हजार रुपयांपर्यंतचं (९५ ते ४०० अमेरिकन डॉलर) किंवा त्याहून अधिक शुल्क घेतात. हे लोक लोकांना त्यांचं यूजर नेम आणि/किंवा त्यांचा पासवर्डही देण्यास सांगतात.

हे अपॉईंटमेंट फिक्सर्स सोशल मीडिया आणि व्हॉट्सऍप, फेसबुक आणि टेलिग्राम यांच्यासारख्या ऍप्लिकेशन्सचा वापर करून लोकांशी संपर्क साधतात. शुल्क भरल्यास व्हिसा अपॉईंटमेंटची खात्री ते देतात आणि चौकशीसाठी थेट मेसेज करण्यास सांगतात.

एखाद्या अज्ञात व्यक्तीनं अशी ऑफर दिल्यास, शुल्क आगाऊ भरण्यास सांगितल्यास किंवा लवकर अपॉईंटमेंट देण्याचं वचन दिल्यास सावध राहा. तुमचा युजरनेम, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती थर्ड पार्टीसोबत शेअर करू नका. अमेरिकेच्या दुतावासातील किंवा वकिलातीमधील कोणताही अधिकारी कोणत्याही परिस्थितीत व्हिसाची खात्री देऊ शकत नाही किंवा अपॉईंटमेंटसाठी अतिरिक्त शुल्क आकारत नाही. तुमच्यासोबत असा काही गैरव्यवहार झाला असल्यास किंवा अतिरिक्त शुल्कासाठी कोणी तुमच्याशी संपर्क साधला असल्यास स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा आणि एफआरची प्रत आम्हाला fraud@ustraveldocs.com वर पाठवा.

अपॉईंटमेंट निश्चित करण्यात तुम्हाला काही अडचणी येत असल्यास support-india@ustraveldocs.com वर आमच्याशी संपर्क साधा किंवा (91-120) 484-4644, (91-40) 4625-8222, 1-703-520-2239 (अमेरिकेतून कॉल करण्यासाठी) या क्रमांकावर कामाच्या तासांमध्ये कॉल करा.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य  ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा