शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक, मेलानिया ट्रम्पच्या न्यूड फोटोचा वापर

By admin | Updated: March 25, 2016 16:45 IST

रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांच्यात सुरु असलेल्या राजकीय लढाईने खालची पातळी गाठली आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २५ - रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांच्यात सुरु असलेल्या राजकीय लढाईने खालची पातळी गाठली आहे. मंगळवारी ट्रम्प विरोधी गटाने एरिझोनामध्ये मतदानापूर्वी सोशल मिडीयावर ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्पचा एका विवस्त्र फोटो प्रसिद्ध केला. 
 
'मेलानिया ट्रम्प यांना भेटा तुमच्या भविष्यातील फर्स्ट लेडी' तुम्हाला हे चित्र नको असले तर, तुम्ही टेड क्रूझ यांना मंगळवारी पाठिंबा द्या असा प्रकारचा प्रचार ट्रम्प विरोधी गटाने चालवला होता. स्लोवानियन-अमेरिकन ज्वेलरी डिझायनर असलेल्या ४५ वर्षाच्या मेलानिया ट्रम्प आधी मॉडलिंग करायच्या. 
 
मेलानिया यांचा हा न्यूड फोटो विवाहापूर्वीचा आहे.  २००० साली जीक्यू मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटच्यावेळचा हा न्यूड फोटो आहे. ट्रम्प यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे विरोधक आता या फोटोचा उपयोग करत आहेत. 
 
या प्रचारावर खवळलेल्या ट्रम्प यांनी टेड क्रूझ यांना तुमच्या पत्नीचाही अशाच प्रकारे प्रचार होऊ शकतो असा इशारा दिला आहे. त्यावर क्रूझ यांनीही लगेच प्रत्युत्तर दिले आहे. ट्रम्प तुमच्या पत्नीचा हा फोटो आम्ही समोर आणलेला नाही. पण तुम्ही माझ्या पत्नीबाबत असे करायचा विचार करत असाल तर, मी समजतो त्यापेक्षा तुम्ही तुम्ही डरपोक आहात असेच मी म्हणेन.