शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मर्यादा ओलांडल्यास तुमच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून फेकू; डोनाल्ड ट्रम्प यांची तुर्कीला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 16:41 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कस्थानला धमकी दिली आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कस्तानला धमकी दिली आहे. तुर्कस्ताननं मर्यादा ओलांडल्यास त्यांची पूर्ण अर्थव्यवस्थाच मुळापासून उखडून टाकणार, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेनं तुर्कीच्या सीमेवरच्या अमेरिकन सैनिकांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.तुर्कस्ताननं स्वतःच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी स्वतःच मार्ग काढावा. मी याधीही सांगितलं होतं आणि आताही पुन्हा सांगतो आहे, तुर्कीनं एका सीमेच्या पलिकडे जाऊन काही केल्यास तुर्कीच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला बरबाद करून टाकू, असंही ट्रम्प यांनी धमकीवजा इशारा दिला आहे. तसेच तुर्कस्ताननं स्वतःच कुर्दाचा सामना करून त्यातून मार्ग काढावा. तुर्की, युरोप, सीरिया, इराण, इराक आणि रशियानं कुर्दांचा काय तो निर्णय घ्यावा. आपापल्या क्षेत्रात सापडलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांसंबंधी तुम्हीच निर्णय घ्यावा. आता या अर्थहीन युद्धातून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. सैनिकांना पुन्हा घरी परत बोलवायचा आहे. आम्ही लोकांच्या हितासाठी आतापर्यंत लढाई लढत होतो. आम्ही फक्त जिंकण्यासाधीच लढतो, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. कुर्दांवर हल्ला करणार तुर्की?व्हाइट हाऊसनं जारी केलेल्या एका विधानानुसार, तुर्कस्तान उत्तर सीरियामध्ये कारवाईसाठी पुढे सरसावणार आहे. परंतु या अभियानात तुर्कस्तानबरोबर अमेरिकेचं सैन्य नसेल. तुर्कस्तानच्या सीमेवरून अमेरिकेनं सैन्य हटवलेलं आहे. आता तिकडे फक्त कुर्दच राहिले आहेत. जे इसिसच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेला सहकार्य करत होते. आता तुर्की सेना कुर्दच्या सैन्यावर हल्ला करणार असून, अमेरिकाही यामध्ये पडणार नाही. तर दुसरीकडे अमेरिकेनं तुर्कस्तानमधून सैन्य हटवल्यामुळे ट्रम्प यांच्यावरही टीका केली जात आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निक्की हेलीनंही या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. अमेरिकेनं आपल्या वाट्याचं काम केलं आहे आणि बाकीचं इतरांनी पाहावं, असं म्हणून ट्रम्प यांनी हात झटकले आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प