शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमानवी बोटींनी सज्ज होणार अमेरिकी नौदल

By admin | Updated: October 6, 2014 00:09 IST

अमेरिकी नौदलाचा ताफा लवकरच यंत्रमानवी गस्त बोटींनी (रोबोटिक) सज्ज होणार आहे. या यंत्रमानवी गस्त बोटीत खलाशी नसतील.

वॉशिंग्टन : अमेरिकी नौदलाचा ताफा लवकरच यंत्रमानवी गस्त बोटींनी (रोबोटिक) सज्ज होणार आहे. या यंत्रमानवी गस्त बोटीत खलाशी नसतील. लढाऊ जहाजांचे संरक्षण करण्यासोबत या रोबोटिक बोटी शत्रूंच्या लढाऊ जहाजाच्या दिशेनेही चाल करतील. यामुळे अमेरिकी नौदलाला निर्णायक चढाई करणे सोयीचे होईल.नासाने मंगळावर पाठविलेल्या ‘रोव्हर’ बग्गीसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या धर्तीवर या रोबोटिक बोटी विकसित करण्यात आल्या आहेत.या रोबोटिक गस्त बोटींची पहिली यशस्वी चाचणी आॅगस्टमध्ये व्हर्जिनियातील जेम्स नदीत करण्यात आली. या मानवरहित बोटींमुळे युद्धनौका शत्रूंचा पराभव करण्यास सक्षम होतील. आॅफिस आॅफ नेव्हल रिसर्चच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बोटींचे सेंसस आणि सॉफ्टवेअरमुळे या बोटींचा एक गट तयार करता येऊ शकतो. कंट्रोल आर्किटेक्चर फॉर रोबोटिक एजंट कमांड अँड सेंसिंग नामक तंत्रज्ञान आॅफिस आॅफ नेव्हल रिसर्च ही संस्था विकसित करीत असून या तंत्राचा वापर कोणत्याही बोटीत करता येऊ शकतो.या रोबोटिक गस्ती बोटींचे वैशिष्ट्य असे की, त्या युद्धनौकांचे संरक्षण करीत संशयित नौकांचा माग काढीत त्यांना घेराव घालण्यात सक्षम आहेत. प्रसंगी आदेश मिळताच संशयित बोटींवर निशाणाही साधण्यात त्या सक्षम आहेत. तब्बल दोन आठवडे या बोटींची चाचणी घेण्यात आली, असे नौदल संशोधनप्रमुख अ‍ॅडमिरल मॅथ्यू क्लुंडर यांनी सांगितले. मल्लाका किंवा हॉर्मूझ सामुद्रधुनीतही या बोटी यशस्वीपणे संचार करू शकतात.धोकादायक स्थितीत या बोटी नौसैनिक आणि खलाशांच्या मदतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी कामगिरी बजावण्यास सक्षम आहेत, असे आॅफिस आॅफ नेव्हल रिसर्चचे कार्यक्रम संचालक डॉ. रॉबर्ट ब्रिझोलारा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)