शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इराण संबंध तणावाच्या दिशेने

By admin | Updated: March 21, 2016 02:45 IST

इराणच्या सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या व त्या कथित गुन्ह्याप्रकरणी अलीकडेच अटक करण्यात आलेल्या अमेरिकी नौसैनिकांचे स्मारक उभारण्याचा निर्णय इराणने घेतला आहे.

तेहरान : इराणच्या सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या व त्या कथित गुन्ह्याप्रकरणी अलीकडेच अटक करण्यात आलेल्या अमेरिकी नौसैनिकांचे स्मारक उभारण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. त्यामुळे सुधारत असलेले इराण-अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यता आहे.काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे नौसैनिक चुकून इराणच्या सागरी हद्दीत घुसले होते. त्यामुळे इराणने त्यांना अटक केली होती. वस्तुस्थिती कळल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. आता त्याच सैनिकांचे इराण पुतळे तयार करणार आहे.इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. इराणच्या या निर्णयाने दोन्ही देशांतील संबंध आणखी तणावग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरही त्यांच्या देशातून अंतर्गत टीका होऊ शकते. या मुद्यावरून रिपब्लिकन पक्ष त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. संयुक्त राष्ट्रांच्या शिफारशीनंतर यंदा जानेवारीत ओबामा यांनी इराणवरील निर्बंध उठविले होते.या स्मारकाला ‘रहियान -ए-नूर’चा दर्जा देण्यात येणार आहे. त्यांचा लष्कराशी निगडित स्मारकात समावेश केला जाणार आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने १२ जानेवारी रोजी अमेरिकेच्या १० नौसैनिकांना पकडले होते आणि १६ तासांनंतर त्यांना सोडून दिले होते.डेलीमेलच्या आॅनलाईन वृत्तानुसार रिव्होल्युशनरी गार्डमधील नौदल प्रमुख अली फदाकी म्हणाले की, अमेरिकी सैनिकांनी कशा प्रकारे इराणी सैनिकांसमोर आत्मसमर्पण केले होते, हे या पुतळ्यावरून दिसून येईल. अमेरिकी सैनिकांच्या अटकेची अनेक छायाचित्रे आमच्याकडे उपलब्ध असून त्यावरून हे पुतळे तयार करण्यात येतील. हे स्मारक ‘स्वर्ग’ या इराणी बेटावर उभारण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे ‘टेलिग्राफ’च्या वृतात म्हटले आहे.