शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 07:16 IST

विशेषत: बांगला देशासह इतर ठिकाणी हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा ट्रम्प यांनी निषेध केला होता.

वाॅशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक चार दिवसांवर आली असताना माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूंच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याचा मुद्दा मांडून नवा डाव प्रचारादरम्यान टाकला. विशेषत: बांगला देशासह इतर ठिकाणी हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा ट्रम्प यांनी निषेध केला होता.

हिंदूंच्या भावनांचा आदर करून या समुदायाच्या मानवाधिकारांचे कट्टरवादी डाव्या विचारसरणीसह धर्मविरोधी अजेंड्यापासून रक्षण करण्याचे अभिवचन ट्रम्प यांनी दिले आहे. गुरुवारी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी बांगला देशातील हिंसाचाराचा प्रामुख्याने उल्लेख केला. आपल्या नेतृत्वाखाली कुठेही असे प्रकार घडणार नाहीत, अशी हमी ट्रम्प यांनी दिली. ही नवी खेळी किती यशस्वी ठरेल, हे निकालानंतरच स्पष्ट हाेईल.

‘हॅरिस-बायडेन यांनी केले अमेरिकेचे नुकसान’अमेरिकी उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलपासून युक्रेनपर्यंत अमेरिकेचे नुकसान केले असल्याचे सांगून आपण हिंदूंच्या अधिकारांचे रक्षण करू, अशी हमी ट्रम्प यांनी दिली. दरम्यान, हिंदूज फॉर अमेरिका फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष उत्सव संदुजा यांनी याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले. या मुद्द्यांमुळे निवडणुकीचे वारे बदलले, असा विश्वास संदुजा यांनी व्यक्त केला आहे. 

ट्रम्प अस्थिर, सूडभावनेने पछाडलेले : हॅरिसडोनाल्ड ट्रम्प यांचे संतुलन हरवत चालले आहे. त्यांना बेलगाम सत्ता हवी आहे. त्यांच्या सूडभावना आणि जळाऊ वृत्ती ठासून भरली असल्याची कठोर टीका कमला हॅरिस यांनी शुक्रवारी केली. लास वेगासमध्ये आयोजित सभेत बोलताना हॅरिस म्हणाल्या, ‘ट्रम्प ही निवडणूक जिंकले, तर व्हाइट हाऊसमध्ये ते शत्रूंची यादीच घेऊन येतील.’ दरम्यान, या सभेत प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ सहभागी झाली होती.

ट्रम्प यांनी प्रचाराचा माेर्चा वळविलाराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असताना डाेनाल्ड ट्रम्प यांनी नवा राजकीय डाव टाकला आहे. रिपब्लिकन उमेदवार कधीही जिंकला नाही, अशा न्यू मेक्सिकाे आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये ते प्रचाराला जात आहेत. त्यांनी अचानक मार्ग वळविला. या खेळीमुळे सारेच चकित झाले आहेत.

भारतीयांसोबत दिवाळी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांनी गुुरुवारी भारतीय अमेरिकींसोबत दिवाळी साजरी केली. यानिमित्त देशभरातील मंदिर आणि इतर इमारतींवर रोषणाई केली आहे. या प्रकाशपर्वानिमित्त अमेरिकेत लोकशाहीचा प्रकाश अधिक तेजपुंज व्हावा, असा संदेश त्यांनी दिला.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिका