शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पत्रपरिषदेतही दिसला अमेरिका-क्युबा तणाव

By admin | Updated: March 23, 2016 03:31 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कास्त्रो यांच्या अभूतपूर्व संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान उभय देशांत गेल्या

हवाना : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कास्त्रो यांच्या अभूतपूर्व संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान उभय देशांत गेल्या ५० वर्षांपासून सुरूअसलेला तणाव दृश्य स्वरूपात पाहावयास मिळाला. दोन्ही नेत्यांनी यावेळी मानवाधिकार आणि अमेरिकी निर्बंधांच्या मुद्यावरून एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न केला. या संयुक्त पत्रकार परिषदेने क्युबावासीय हैराण झाले. कारण, या दोन्ही नेत्यांना आतापर्यंत विचारले गेले नसतील एवढ्या थेटपणे प्रश्न विचारले जात होते. उभय देशांतील संबंधात गेल्या १५ महिन्यांत भलेही वेगाने सुधारणा झाली असेल; परंतु या प्रश्नोत्तरांतून त्यांच्यात अजूनही तीव्र मतभेद असल्याचे अधोरेखित झाले. १५ महिन्यांपूर्वी ओबामा व कास्त्रो यांनी दोन्ही देश शीतयुद्धाच्या काळापासूनची मुत्सद्दी पातळीवरील कोंडी फोडत असल्याची घोषणा करून जगाला आश्चर्यचकित केले होते. हवानाच्या पॅलेस आॅफ रिव्होल्युशनमध्ये ही पत्रपरिषद झाली.वैयक्तिक भेटीनंतर ओबामांसह कास्त्रो यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत म्हणून त्यांचे मन वळविण्यासाठी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांना अनेक आठवडे लागले होते. कास्त्रो यांनी पत्रकार परिषद घेणे ही दुर्मिळ बाब आहे. (वृत्तसंस्था)