शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी न्यायालयाकडून सोनियावरील खटला रद्द

By admin | Updated: June 11, 2014 23:02 IST

१९८४ च्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर एका शीख गटाने दाखल केलेला खटला अमेरिकन न्यायालयाने रद्द केला

न्यूयॉर्क : १९८४ च्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर एका शीख गटाने दाखल केलेला खटला अमेरिकन न्यायालयाने रद्द केला असून, या दंगलीसाठी सोनिया गांधी यांना वैयक्तिक पातळीवर जबाबदार धरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे; पण सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा खटला दाखल करण्यास या गटाला बंदी घालण्यात आलेली नाही. अमेरिकेतील जिल्हा न्यायाधीश ब्रायन कोगन यांनी यासंदर्भात १३ पानी निकाल दिला असून, शीख फॉर जस्टिस गटाचा सोनिया गांधी यांच्या विरोधातील खटला घटना घडली त्या स्थळापासून दूर अंतरावर दाखल केलेला असल्याने, तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे या निकालपत्रात म्हटले आहे. शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या गटावर पुढे सोनिया गांधी यांच्यावर खटले दाखल करण्यास बंदी घालावी ही सोनिया गांधी यांची मागणी मात्र अमान्य करण्यात आली आहे. १९८४ च्या दंगलीला दहा वर्षे उलटून गेल्यानंतर १९९८ साली सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, त्यामुळे १९८४ च्या दंगलीत झालेल्या हत्या व छळ यासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे न्या. कोगन यांनी म्हटले आहे. एसएफजेने खटला दाखल करण्यापूर्वी ३० वर्षे आधी नवी दिल्ली येथे या दंगली घडल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाला प्रत्युत्तर देणे कठीण आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सोनिया गांधी यांचे वकील रवी बात्रा यांच्या मते, या खटल्याचा निकाल चांगला लागला असून, एसएफजेने प्रसिद्धी मिळविण्यासाठी कुहेतूने केलेली कसरत न्यायालयाने फेटाळली आहे; पण एसएफजेचे विधि सल्लागार जी एस पन्नुन यांनी भविष्यातही काँग्रेस नेत्यांवर १९८४ च्या दंगलीबद्दल खटले दाखल करूअसे सांगितले. एप्रिल महिन्यात अन्य एका न्यायालयाने काँग्रेस पक्षाविरोधात दाखल करण्यात आलेले मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यासंदर्भातील एसएफजेचा खटला रद्द केला होता. (वृत्तसंस्था)