शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

अमेरिका करणार इसिसवर हल्ला!

By admin | Updated: September 12, 2014 02:59 IST

अमेरिका इस्लामिक स्टेटला (इसिस) दुर्बळ बनवून अखेरीस नष्ट करेल, असा निर्धार राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिका इस्लामिक स्टेटला (इसिस) दुर्बळ बनवून अखेरीस नष्ट करेल, असा निर्धार राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला आहे. सिरियात हवाई हल्ले आणि इराकमध्ये आणखी ४७५ लष्करी सल्लागार नियुक्त करण्यासह इसिसविरुद्धच्या लष्करी मोहिमेचा व्यापक विस्तार करण्याची घोषणा त्यांनी केली. आम्ही सर्वंकष, सातत्यपूर्ण दहशतवादविरोधी रणनीतीद्वारे इसिसला दुर्बळ बनवून अखेरीस नष्ट करू, असे ओबामा म्हणाले. मात्र, त्यांनी या दहशतवादी संघटनेला कधीपर्यंत नामोहरम करणार हे जाहीर केले नाही. ओबामांचे भाषण टीव्हीद्वारे संपूर्ण राष्ट्रामध्ये प्रसारित करण्यात आले. या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्यासाठी अमेरिका एका मोठ्या आघाडीचे नेतृत्व करेल. अमेरिका या दहशतवाद्यांविरुद्ध हवाई हल्ल्यांची मोहीम राबवेल.इसिसविरुद्धच्या अमेरिकाप्रणीत आंतरराष्ट्रीय आघाडीसाठी विविध प्रकारचे योगदान देण्यासाठी तीन डझनांहून अधिक देश समोर आले आहेत. इसिसने इराक आणि सिरियाच्या मोठ्या भूभागावर ताबा प्राप्त केला असून हे क्षेत्र क्षेत्रफळाने ब्रिटनएवढे आहे. ही संघटना आता अधिक धोकादायक बनू लागली आहे. ओबामांनी १५ मिनिटांच्या भाषणात सांगितले की, इराक सरकारसोबत काम करताना आम्ही आमच्या प्रयत्नांना आमच्या नागरिकांचे रक्षण व मानवीय मोहिमांहूनही अधिक विस्तारित करू. त्यामुळेच इराकी दले आक्रमक झालेली असताना आम्ही इसिसच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. जमिनीवर दहशतवाद्यांशी लढत असलेल्या लष्करी दलांच्या मदतीत अमेरिका वाढ करेल, असे सांगून त्यांनी आणखी ४७५ लष्करी सल्लागार पाठविण्याची घोषणा केली. हे सल्लागार पोहोचल्यानंतर तेथील अमेरिकी सैनिकांची संख्या वाढून १,६०० होणार आहे. कर्करोगाप्रमाणे पसरलेल्या इसिसला उखडून टाकण्यासाठी वेळ लागेल, असेही ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)