शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
4
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
5
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
6
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
7
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
8
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
9
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
10
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
11
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
13
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
14
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
15
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
16
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
17
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
18
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
19
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली
20
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील गोळीबार प्रकरणी एका संशयिताला अटक; दोन जण ठार, १२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 02:11 IST

ग्रीनव्हिला : अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी रात्री एका पार्टीमध्ये अंदाधुंद गोळीबार करून दोन जणांना ठार केल्याप्रकरणी ब्रँडन रे गोन्झालिस (२३ ...

ग्रीनव्हिला : अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी रात्री एका पार्टीमध्ये अंदाधुंद गोळीबार करून दोन जणांना ठार केल्याप्रकरणी ब्रँडन रे गोन्झालिस (२३ वर्षे) या संशयित आरोपीला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या गोळीबारात १२ जण जखमी झाले आहेत.टेक्सास ए अँड एम विद्यापीठापासून १५ किमी दूर असलेल्या ग्रीनव्हिलामध्ये सुरू असलेल्या पार्टीत सुमारे ७५0 जण सहभागी झाले होते. त्यातील एका व्यक्तीला ठार मारण्यासाठी हल्लेखोर आला असावा असा पोलिसांचा कयास आहे. केव्हिन बेरी व ब्रायन क्रेव्हन अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. टेक्सास ए अँड एम विद्यापीठाने नव्हे तर तिथे शिकणारे विद्यार्थी व अन्य संबंधितांनी खासगीरित्या या पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीच्या ठिकाणी मागच्या दाराने हल्लेखोराने प्रवेश केला व आपल्याकडे असलेल्या हँडगनमधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ माजला. सगळेजण आपला जीव बचावण्यासाठी सैरावैरा धावू लागले. त्याचा फायदा घेऊन हल्लेखोरही तिथून पळून गेला होता.

या प्रकरणी अटक केलेल्या ब्रँडन रे गोन्झालिस या संशयिताला ग्रीनिव्हिला येथील हंट काऊंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. हा हल्ला आपण केला नसल्याचा त्याने दावा केला आहे. प्रकृती चिंताजनकया गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुर आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.