शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णवर्णीयांच्या हत्येच्या विरोधात अमेरिकेत मोर्चे

By admin | Updated: December 15, 2014 02:59 IST

नि:शस्त्र कृष्णवर्णीयांच्या पोलिसांकडून होणाऱ्या हत्यांमुळे संपूर्ण अमेरिकेत लोक संतप्त असून, न्यूयॉर्क, बोस्टन व वॉशिंग्टन या शहरात पोलिसांविरोधात निघालेल्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले.

वॉशिंग्टन : नि:शस्त्र कृष्णवर्णीयांच्या पोलिसांकडून होणाऱ्या हत्यांमुळे संपूर्ण अमेरिकेत लोक संतप्त असून, न्यूयॉर्क, बोस्टन व वॉशिंग्टन या शहरात पोलिसांविरोधात निघालेल्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले. फर्गसन, मिसुरी, न्यूयॉर्क, क्लीव्हलँड येथे सशस्त्र गौरवर्णीय पोलिसांनी कृष्णवर्णीय पुरुषांची हत्या केली. त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेले हे मोर्चे शांततेत निघाले. बोस्टनमध्ये महामार्ग अडविणाऱ्या २३ लोकांना अटक करण्यात आली आहे. मायकेल ब्राऊन हा १८ वर्षीय युवक व एरिक गार्नर हा प्रौढ कृष्णवर्णीय यांची हत्या करणाऱ्या पोलिसांना ग्रँड ज्युरींनी निर्दोष सोडून दिले. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. पोलिसांच्या अत्याचाराची प्रकरणे घेण्याची परवानगी सरकारी वकिलांना असावी, अशी मागणी वॉशिंग्टन येथील मोर्चाचे आयोजन करणाऱ्या रेव्ह. अल शर्पटन यांनी केली आहे. मोर्चात सहभागी असणारे बहुतांशजण पालक होते. आपापल्या मुलांसह ते मोर्चात सहभागी होते. नो जस्टिस, नो पीस, नो रेसिस्ट पोलीस अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. मोर्चात माणसांचा समुद्र पसरला आहे, हे पाहून जर पोलीस बदलणार नसतील, तर आणखी काय करावे हे मला कळत नाही, असे मायकेल ब्राऊनच्या आईने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)