शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

"युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'ला पाकचं पाठबळ, 30 कोटी केले मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 22:25 IST

युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद या मदरशाला पाकिस्तानमधील खैबर पख्तुन ख्वाँ राज्यातील सरकारने तब्बल 30 कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

पेशावर, दि. 19-  युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद या मदरशाला पाकिस्तानमधील खैबर पख्तुन ख्वाँ राज्यातील सरकारने तब्बल 30 कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी दिला आहे. या मदरसामध्ये तालिबानचा म्होरक्‍या मुल्ला ओमर याच्यासहित इतर अनेक अफगाण तालिबानी दहशतवाद्यांनी शिक्षण घेतल्याची माहिती आता समोर येते आहे. ओमर याला या मदरसाकडून मानद डॉक्‍टरेटही दिल्याची खळबळजनक माहिती मिळते आहे. 

दारुल उलूम हक्कानिया नौशेरा मदरशास 30 कोटींचा निधी मंजूर करताना मला अभिमान वाटत आहे, असे या राज्यातील मंत्री शाह फरमान यांनी म्हटले आहे. मशिदी आणि मदरशांनाही सरकारकडून निधी देण्यात येणार आहे. तेहरिक-इ-इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाची या राज्यात सरकार आहे. धार्मिक संस्थांवर छापे न मारता त्यांना आर्थिक मदत देण्याचे आमचं धोरण असल्याचा फतवा त्यांनी काढला आहे. 1947 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मदरशाचे मुख्य सध्या मौलवी सामी उल-हक आहेत. मौलवी पाकिस्तानमधील 40 पेक्षा जास्त संघटनांची एकत्रित संस्था असलेल्या दिफा-इ-पाकिस्तानचेही अध्यक्ष आहेत. दिफा-इ-पाकिस्तानमध्ये जमात उल दावा आणि सिपाह-इ-सहाबा अशा दहशतवादी संघटनांचाही समावेश असल्याची माहिती मिळते आहे.