वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका काँग्रेसमधील काही सदस्य यांचा विरोध धुडकावून पाकिस्तानला आठ एफ-१६ विमानांची विक्री करण्याचा निर्णय ओबामा प्रशासनाने घेतला आहे.ओबामा प्रशासनाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करताना विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते हेलेन डब्ल्यू व्हाईट म्हणाले की, पाकिस्तानच्या दहशतवादीविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी प्रस्तावित आठ एफ-१६ विमानांच्या विक्रीस आमचा पाठिंबा आहे. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत ही विमाने निर्णायक ठरणार आहेत. म्हणूनच आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो. विमानाची विक्री करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याबद्दल येथील पाकिस्तानी दूतावासाने ओबामा प्रशासनाची प्रशंसा केली आहे.
अमेरिका पाकला विमाने देणारच
By admin | Updated: February 28, 2016 01:27 IST