शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत कोरोनाचा जोर कमी होईना; जो बायडेन यांच्या सुरक्षेतील 200 कोरोनाग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 05:16 IST

शपथविधी सोहळ्यात जवानांना झाला संसर्ग : उपचार सुरू

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीसाठी २५ हजारांहून अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते. त्यांपैकी सुमारे २०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले आहे. त्या जवानांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकी संसदेच्या कॅपिटॉल इमारतीवर ट्रम्प समर्थकांनी ६ जानेवारी रोजी हल्ला केला व तिथे हिंसाचारात काहीजण ठार झाले. या देशाच्या लोकशाही इतिहासाला काळिमा फासणारी ती घटना होती. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना चिथावणी दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे जो बायडेन यांच्या शपथविधीच्या वेळी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यावेळी कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी शरीराचे तापमान मोजण्यापासून ते फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची सर्व प्रकारची काळजी अमेरिकी प्रशासनाने घेतली होती. इतके करूनही बायडेन यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सुमारे २०० जवानांना कोरोनाची बाधा झाली.

सहा लाखांहून अधिक बळी जाण्याची शक्यताअमेरिकेत कोरोनामुळे सहा लाखांहून अधिक लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे, असा इशारा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. कोरोना लसीकरण मोहीम अमेरिकेने सुरू केली असली तरी तिथे या साथीचा जोर कमी झालेला नाही. कोरोना साथीमुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

ब्रिटनचा नवा विषाणू अधिक धोकादायकब्रिटनमधील नवा कोरोना विषाणू हा मूळ विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहे, असे संशोधनातून आढळून आले आहे.  पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, ५४ लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली.

टेबलवरून हटविले डाएट कोक बटणअमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ज्यावेळी डाएट कोक पिण्याची लहर यायची तेव्हा ते त्वरित मागविण्यासाठी आपल्या टेबलाजवळ त्यांनी एक बटण बसविले होते. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे डाएट कोक बटण काढून टाकले आहे.

संघाशी संबंधित दोघांना ठेवले दूरअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या प्रचारकार्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले व रा. स्व. संघाशी संबंधित असलेले सोनल शहा व अमित जानी या दोघांना बायडेन यांनी सत्तेत आल्यानंतर अद्याप कोणतीही खास जबाबदारी सोपविलेली नाही.

 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या