शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
4
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
5
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
6
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
7
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
8
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
9
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
10
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
11
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
12
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
13
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
14
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
15
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
16
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
17
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
18
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
19
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
20
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

अंडरटेकरने घेतला डब्ल्यूडब्ल्यूईचा निरोप

By admin | Updated: April 4, 2017 05:19 IST

डब्ल्यूडब्ल्यूईच्या एका युगाचा अंत झाला. ९० च्या दशकातील बच्चेकंपनीचा लाडका ‘डेडमॅन द अंडरटेकर’ हा ‘रोमन रेन्स’सोबतच्या सामन्यात पराभव झाला

फ्लोरिडा : डब्ल्यूडब्ल्यूईच्या एका युगाचा अंत झाला. ९० च्या दशकातील बच्चेकंपनीचा लाडका ‘डेडमॅन द अंडरटेकर’ हा ‘रोमन रेन्स’सोबतच्या सामन्यात पराभव झाला आणि त्याने ‘रेसलमेनिया’चा निरोप घेतला. तो आता कधीही डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये दिसणार नाही. तब्बल २७ वर्षे मनोरंजन करून त्याने सर्वांच्या हृदयात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. रेसलमेनियाच्या ३३ व्या पर्वाचा मुख्य सामना अंडरटेकर आणि रोमम रेन्स यांच्यात झाला. रोमन रेन्सच्या प्रसिद्ध सुपरमॅन पंचसमोर अंडरटेकरने गुडघे टेकले. यापूर्वी रेसलमेनियाच्या ३० व्या पर्वात ब्रॉक लेस्नरने अंडरटेकरला हरवले होते. रेन्सकडून झालेला पराभव हा अंडरटेकरचा रेसलमेनियातील दुसरा पराभव ठरला. रेसलमेनियात तब्बल २३ सामने जिंकणाऱ्या अंडरटेकरला केवळ २ पराभवांचा सामना करावा लागला आहे. सामन्यानंतर अंडरटेकर रिंगमध्ये उभे राहण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्याची परिस्थिती नाजूक बनली होती. चाहते त्याच्या नावाचा जयघोष करीत होते. त्यांच्या डोळ्यात आसवे दाटली होती. मात्र, अंडरटेकर उठू शकला नाही. थोड्या वेळाने अंटरडेकरने हातातील ग्लोव्ज, कोट आणि टोपी उतरवून रिंगच्या मधोमध ठेवून तो रिंगमधून बाहेर पडला. त्यामुळे डब्ल्यूडब्ल्यूईच्या जगातील शहेनशहा डेडमॅनने संन्यास घेतल्याचे स्पष्ट झाले. डेडमॅन निघून जाताना प्रेक्षक एकसाथ म्हणाले, थँक्यू अंडरटेकर. अंडरटेकरने दिवे लावण्यास सांगितले. त्याने हवेत मूठ हलवून सर्वांना अभिवादन केले आणि हळूहळू तो अंधारांत नाहीसा झाला. अंडरटेकरचे खरे नाव मार्क विलिय्म कॉलावे आहे. ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट’द्वारे आयोजित रेसलमेनियाचे हे ३३ वे पर्व होते. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेली ही स्पर्धा ६५ हजार लोकांनी लाईव्ह पाहिली.१९९० मध्ये अंडरटेकर डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आला होता. म्युझिक वाजल्यानंतर संपूर्ण एरिनामध्ये काळोख पसरून अचानक डेडमॅन द अंडरटेकर रिंगमध्ये उभा दिसतो. इतकी वर्षे झाल्यानंतरही अंडरटेकरची ही एन्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. मात्र, यापुढे त्याच्या या अनोख्या एन्ट्रीला प्रेक्षक मुकणार हे निश्चित.