शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

युक्रेन : सार्वमतास रशियाचा पाठिंबा

By admin | Updated: May 13, 2014 04:48 IST

युक्रेनच्या पूर्व भागातील फुटीरवाद्यांच्या सार्वमताला रशियाने रविवारी पाठिंबा जाहीर केला. या सार्वमतात नागरिकांनी स्वयंशासनाला कौल दिल्याचा बंडखोरांचा दावा आहे.

 मॉस्को : युक्रेनच्या पूर्व भागातील फुटीरवाद्यांच्या सार्वमताला रशियाने रविवारी पाठिंबा जाहीर केला. या सार्वमतात नागरिकांनी स्वयंशासनाला कौल दिल्याचा बंडखोरांचा दावा आहे. अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांनी अवैध म्हणून, तर युक्रेनने फार्स संबोधत हे सार्वमत फेटाळून लावले आहे. रशियाने सार्वमताच्या परिणामांना पाठिंबा दर्शवितानाच युक्रेन सरकार आणि बंडखोरांना परस्परांशी चर्चा करण्याचेही आवाहन केले आहे. दुसरीकडे रशियावरील निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत विचार करण्यासाठी युरोपियन युनियनच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. डोनेटस्क आणि लुगान्सक येथील नागरिकांच्या इच्छेचा आपण सन्मान करतो, असे रशियाने एका निवेदनात म्हटले आहे. या सार्वमताच्या निकालाची अंमलबजावणी अत्यंत नागरी पद्धतीने व्हावी. यात हिंसाचाराच्या पुनरावृत्तीला थारा असू नये आणि युक्रेन तसेच डोनेटस्क, लुगान्सकच्या प्रतिनिधींमधील चर्चेद्वारे तो अमलात आणला जावा, असे आवाहन रशियाने केले आहे. हे सार्वमत अत्यंत घाईघाईने घेण्यात आले व यासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय निरीक्षक उपस्थित नव्हता. शीतयुद्धानंतर रशिया आणि पाश्चात्त्य देशांचे संबंध रसातळाला जाण्यास कारणीभूत ठरलेला युक्रेन पेच ताज्या सार्वमताने आणखी तीव्र बनला आहे. रविवारी झालेल्या सार्वमतात ८९ टक्के नागरिकांनी युक्रेनमधून फुटून निघण्याच्या बाजूने कौल दिल्याचे डोनेटस्क प्रांतातील एका फुटीरवादी अधिकार्‍याने सांगितले. लुगान्सक व इतर फुटीरवादी प्रांतातूनही असाच निकाल अपेक्षित आहे. या सार्वमताच्या निष्कर्षाला आपण अजिबात मान्यता देणार नसल्याचे अमेरिका, इतर पाश्चात्त्य देशांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था) रशियाने युक्रेनचे क्रिमिया बेट ताब्यात घेतल्यानंतर दोन महिन्यांनी हे सार्वमत घेण्यात आले. सार्वमतादरम्यान पूर्व युक्रेनच्या काही भागात हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडल्याचे वृत्त आहे. पूर्व भागात युक्रेनियन लष्कर सशस्त्र बंडखोरांविरुद्ध कारवाई करत आहे. सशस्त्र युक्रेन समर्थकांच्या एका गटाने रशिया समर्थकांच्या गर्दीवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. गोळीबारानंतर दोन जण जमिनीवर निश्चल पडल्याचे दिसून आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला किंवा काय हे लगेचच समजू शकले नाही, असे एका पत्रकाराने सांगितले. १० टक्के नागरिकांचा विरोध डोनेटस्क : युक्रेनच्या पूर्व भागातील डोनेटस्क शहरात रविवारी घेण्यात आलेल्या सार्वमतात ८९ टक्के नागरिकांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मत टाकले, तर १० टक्के लोकांनी त्याच्या विरोधात मत दिले, असे बंडखोरांच्या स्वयंघोषित निवडणूक आयोगाने जाहीर केले. डोनेटस्कप्रमाणेच लुगान्सकमध्येही सार्वमत घेण्यात आले. त्याचे निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. युक्रेनच्या एकूण ४.६ कोटी लोकसंख्येपैकी ७० लाख नागरिक याच दोन भागात राहतात. या वादग्रस्त सार्वमतामुळे युरोपच्या पूर्व भागात यादवी उफाळू शकते, अशी भीती पाश्चात्त्य देशांना सतावत आहे.