शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

दहशतवादविरोधी लढाईत यूएई भारतासोबत - नरेंद्र मोदी

By admin | Updated: August 18, 2015 16:21 IST

दहशतवाद्यांच्या विरोधात सामना करण्यासाठी यूएई भारतासोबत असून इतर देशांनीही दशतवाद्यांशी विरोधात एकत्र आले पाहिजे असे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील दुबई स्टेडियमध्ये

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. १७ -  दहशतवाद्यांच्या विरोधात सामना करण्यासाठी यूएई भारतासोबत असून इतर देशांनीही  दहशतवाद्यांच्या विरोधात एकत्र आले पाहिजे असे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील दुबई स्टेडियमध्ये उपस्थित भारतवासियांना संबोधित करताना सांगितले. यावेळी दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी जवळ-जवळ ५० हजार भारतीय उपस्थित होते. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे....
- दुबईतील भारतवासीयांचे भारताचे नाव मोठे करण्यात मोठा वाटा आहे. 
- यूएईत दर आठवड्यात ७०० पेक्षा जास्त विमाने येथे येतात, मात्र पंतप्रधानांना यायला ३४ वर्षे लागली. 
- युएईचे प्रिन्स  आपल्या पाच भावांसह माझ्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले होते.
-  दुबईत राहून तुम्ही आपल्या आचरणामुळे आणि व्यवहामुऴे भारतीयांचा गौरव वाढला आहे. 
- भारतात आपत्ती आली तर दुबईतील भारतवासी शांत बसणार नाही.
- अनेकांनी मला चांगली कामे करण्यासाठी पाठविले आहे, त्यामधीलच एक महत्त्वाचे आणि चांगले काम करण्यासाठी दुबईत आलो आहे. 
- दुबईत केरळमधून आलेला भारतीय समुदाय सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यांना धन्यवाद देतो. 
- भारतात प्रिन्स यांनी चाडेचार लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे, जर आपल्यावर कुणाचा भरवसा नसेल तर कोण १० रुपये सुद्धा द्यायला तयार होणार नाही.
-  तालिबाने चांगले नाही वाईट असे आता चालणार नाही. 
-  दुबईत भारतातून आलेल्या सर्व भारतीयांनी दोनदिवसापूर्वी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला, मी सुद्धा आपल्याला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्या देतो.
- अनेकांनी मला चांगली कामे करण्यासाठी पाठविले आहे, त्यामधीलच एक महत्त्वाचे आणि चांगले काम करण्यासाठी दुबईत आलो आहे. 
-  भारताजवळ असलेल्या नेपाऴला जायला फक्त ७० मिनिटे लागतात, पण भारताच्या पंतप्रधानांना जायला १७ वर्षे लागली.
-  शेजारी असलेल्या मालदीवमध्ये मशीन खराब झाल्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. कल्पना करा कीती मोठे संकट असेल, त्यावेळी आम्ही जहाजाने त्याठिकाणी पाणी पोहचविण्याचे काम केले.
- सुरुवातीला सार्क असा एक मंच होता, की त्याठिकाणी एकमेकाला अडविण्याचा प्रयत्न केला जात होता, आता सर्व मिळून मिसऴून चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
-  अफगाणिस्तान आपला सहयोगी देश आहे, आम्ही मिऴून विकास करण्यासाठी पुढे जात आहोत. यापुढेही असे मिऴून पुढे जाणार 
- पाच वर्षाच्या आत भारतात सर्व भागात २४ तास वीज देण्याचा आम्ही प्रयत्न करत असून तो आम्ही पूर्ण करणार आहोत.
-  भारत सरकारने मदद नावाचे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केले आहे, त्यामुळे याचा उपयोग करुन जगात असणा-या सर्व भारतीयांनी आपले म्हणणे मांडू शकणार आहेत.
-  विदेशात भारतीयांसाठी भारतीय पद्धतीच्या शाळा सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे.
- - विदेशात राहणा-या भारतीयांना पासपोर्ट किंवा अन्य समस्यांसाठी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहणे सोपे व्हावे तसेच त्यांचे काम झटपट व्हावे यासाठी केंद्र सरकारने दोन वेबसाइट सुरु केल्या आहेत, https://emigrate.gov.in/ आणि https://org1.passportindia.gov.in/AppConsularProject/welcomeLink या त्या वेबसाइट आहेत.
-  विदेशातल्या भारतीयांना कायदेशीर अडचणींमध्ये मदत करण्यासाठी इंडियन कम्युनिटी वेल्फेअर फंड सुरु केला आहे, प्रत्येक भारतीय दूतावासाला हा फंड दिला जाईल.
- विदेशातल्या भारतीयांना मदत करताना आम्ही पासपोर्टचा रंग नाही तर रक्ताचे नाते बघतो, भेदभाव करत नाही.