शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन ग्रहांची टक्कर होऊन पृथ्वीची निर्मिती?

By admin | Updated: February 3, 2016 02:48 IST

एका ग्रह-भ्रूणाशी समोरासमोर महाभयंकर धडक होऊन आजच्या पृथ्वीची उत्पत्ती झाल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे.

वॉशिंग्टन : एका ग्रह-भ्रूणाशी समोरासमोर महाभयंकर धडक होऊन आजच्या पृथ्वीची उत्पत्ती झाल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. मंगळ किंवा पृथ्वीच्या आकाराचा थेईआ नावाचा ग्रह-भ्रूण आणि ४.५ अब्ज वर्षांपूर्वीची पृथ्वी यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक झाली तेव्हा पृथ्वी केवळ १०० दशलक्ष वर्षांची होती. थेईआ आणि पृथ्वीची धडक झाल्याचे सर्वविदित आहे. मात्र, थेईआ पृथ्वीला चाटून गेल्याचा निष्कर्ष यापूर्वीच्या संशोधनातून काढण्यात आला होता. तथापि, यूसीएलएच्या वैज्ञानिक पथकाने थेईआ पृथ्वीला चाटून गेला नव्हता तर त्याची व पृथ्वीची समोरासमोर धडक झाली होती, असा निष्कर्ष काढला. या निष्कर्षानुसार, ही धडक एवढी भयंकर होती की पृथ्वी आणि थेईआ एकमेकांत सामावले जाऊन नवा ग्रह उदयास आला. हा ग्रह म्हणजे आजची आपली पृथ्वी. विशेष म्हणजे या धडकेतून उडालेला छोटा तुकडा आपण चंद्राच्या रूपाने पाहतो.या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि यूसीएलएचे प्रोफेसर एडवर्ड यंग म्हणाले की, पृथ्वी व चंद्राच्या आयसोटॉप्समध्ये आम्हाला कोणताही फरक दिसला नाही. ठिकाणाचा फरक वगळता रासायनिक आधारावर या दोन्ही खडकांना वेगळे करताच येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. थेईआ हा ग्रह-भ्रूण पृथ्वी आणि चंद्रात पूर्णपणे सामावला गेला. त्यामुळेच आम्हाला पृथ्वी व चंद्र यांच्यात थेईआचे स्वतंत्र असे कोणतेही अस्तित्व दिसत नाही. थेईआ विकसित होत होता व पृथ्वीशी धडक होऊन नष्ट झाला नसता, तर तो स्वतंत्र ग्रह बनला असता. या संशोधनासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा, द डीप कार्बन आॅब्जर्वेटरी व युरोपियन रिसर्च कौन्सिल अ‍ॅडव्हॉन्स्ड ग्रँटने अर्थसाहाय्य पुरविले. यंग यांच्या पथकाने केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष सायन्स या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निष्कर्षातून थेईआ व जुन्या पृथ्वीच्या धडकेने पृथ्वीवरील पाणी नष्ट झाले होते का यासारखे पृथ्वीच्या मुळाविषयीचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या धडकेनंतर हजारो वर्षांनी पाण्याने समृद्ध लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता. (वृत्तसंस्था)