शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दोन भारतीय पत्रकारांना पाक सोडण्याचे आदेश

By admin | Updated: May 15, 2014 04:19 IST

पाकिस्तानमध्ये कार्यरत दोन भारतीय पत्रकारांना तेथील सरकारने कोणतेही कारण न देता देश सोडून जाण्यास सांगितले आहे.

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये कार्यरत दोन भारतीय पत्रकारांना तेथील सरकारने कोणतेही कारण न देता देश सोडून जाण्यास सांगितले आहे. ‘पीटीआय’चे स्नेहेश अ‍ॅलेक्स फिलिप आणि ‘द हिंदू’च्या मीना मेनन यांना पाकिस्तान सरकारने एक पत्र पाठवून त्यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात येत नसल्याचे कळविले आहे. हे दोन्ही पत्रकार गेल्या नऊ महिन्यांपासून राजधानी इस्लामाबादेत कार्यरत होते. भारत सरकार पाक सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान सरकार किंवा दिल्लीतील त्यांच्या उच्चायुक्तालयाने या घडामोडींची आगाऊ सूचना दिली नव्हती, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या दोन्ही पत्रकारांना २० मे पर्यंत देशातून जाण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून यासंदर्भात कोणतेही कारण दिले गेलेले नाही. पाक सरकारच्या या पावलानंतर भारत व पाकिस्तानात परस्परांचे पत्रकार नसण्याची ही पहिलीच वेळ असेल, असे दिल्लीतील सरकारी सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था/ लोकमत न्यूज नेटवर्क)