शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन भावांनी घडविला हल्ला

By admin | Updated: March 24, 2016 02:15 IST

बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये झालेल्या भयंकर बॉम्ब स्फोटांमधील आत्मघातकी हल्लेखोर हे भाऊअसल्याचा दावा करण्यात येत आहे. तर यातील तिसरा संशयित फरार आहे.

ब्रुसेल्स : बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये झालेल्या भयंकर बॉम्ब स्फोटांमधील आत्मघातकी हल्लेखोर हे भाऊअसल्याचा दावा करण्यात येत आहे. तर यातील तिसरा संशयित फरार आहे. खालिद आणि इब्राहीम अल बक्रोई या दोघांनी स्फोटात स्वत:ला उडवून दिले. पॅरिस हल्ल्यातील मुख्य संशयित अब्देलसलाम याच्याशीही या दोन भावांचा संबंध होता.पोलीस त्यांचा शोध घेत होते. खालिदने मागील आठवड्यात खोट्या नावाने ब्रुसेल्समध्ये किरायाने घर घेतले होते. पोलिसांनी या ठिकाणावर छापा टाकला होता तेव्हा पोलिसांना या ठिकाणी अब्देलसलामच्या बोटांचे ठसे मिळाले होते. युरोपातील मोस्ट वाँटेड अब्देलसलाम याला मागील आठवड्यात पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक केली. ही अटक म्हणजे दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील बेल्जियमच्या अभियानाचे मोठे यश मानले जात आहे. दक्षिण बेल्जियमच्या चार्लेरोई शहरात किरायाने घेतलेल्या घराशीही खालिदचा संबंध आहे. इसिसचे हल्लेखोर त्याच्या घरातून निघाले होते आणि त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी त्यांनी पॅरिसमध्ये हल्ला केला होता. यात १३० जण ठार झाले होते. पोलिसांनी बुधवारी आवाहन करून दोन व्यक्तींबद्दल माहिती मागविली आहे. या दोघांनीच विमानतळावर स्वत:ला उडवून दिले असा दावा केला जात आहे. पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे की, या व्यक्तींना कोणी ओळखते का? यात सीसीटीव्हीतील छायाचित्र दाखविण्यात आले आहे. विमानतळावरील हॉलमधून सुटकेस असलेल्या ट्रॉली घेऊन जाताना हे संशयित छायाचित्रात दिसत आहेत. पोलिसांनी या दोन व्यक्तींचे प्रत्येकी तीन अशी छायचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रात ते किंचित वेगळे दिसतात. तिसऱ्या व्यक्तीने फिकट जॅकेट आणि एक गडद टोपी परिधान केलेली आहे. ही व्यक्ती पळून गेली असावी असा अंदाज लावला जात आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, विमानतळावर स्फोटापूर्वी सीसीटीव्हीत दिसलेल्या तीन व्यक्तीत मध्यभागी दिसणारा व्यक्ती इब्राहीम अल बक्रोई असू शकतो, तर अन्य एक भाऊ (ज्याचे नाव सांगितले नाही) हा मेट्रो स्टेशनवरील हल्ल्यात सहभागी असू शकतो. संशयिताला पकडले, पण... या हल्ल्यातील एक प्रमुख संशयित नजीम लाचराओई याला पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली; पण काही वेळातच बेल्जियमच्या मीडियाने स्पष्ट केले की, अटक करण्यात आलेली व्यक्ती नजीम लाचराओई नाही. अर्थात नजीमच्या अटकेवरून सुरू असलेला हा प्रकार म्हणजे रणनीतीचाच एक भाग असावा असा अंदाज बांधला जात आहे.