शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीत सहा हजार जण ताब्यात

By admin | Updated: July 18, 2016 06:04 IST

सरकार उलथून पाडण्याचा हेतू असल्याबद्दल तुर्कस्तानने सुमारे ६ हजार जणांना ताब्यात घेतले आहे.

इस्तंबुल : सरकार उलथून पाडण्याचा हेतू असल्याबद्दल तुर्कस्तानने सुमारे ६ हजार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी लोकांना ताब्यात घेतले जाईल, असे न्याय मंत्री बेकीर बोझडॅग यांनी रविवारी सांगितले. बंड मोडून काढण्याचे काम सध्या सुरू आहे, असे बोझडॅग म्हणाल्याचे ‘अनादोलू’ या सरकारी वृत्तसेवेने म्हटले.तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी अत्यंत कठोरपणे राबविलेल्या मोहिमेमध्ये कित्येक डझन वरिष्ठ लष्करी अधिकारी व न्यायमुर्तींना ताब्यात घेतले. अध्यक्ष रिसेप तय्यीप यांना ईर्डोगॉन यांना पदच्युत करण्याच्या हेतुने झालेल्या या बंडाचा धिक्कार करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यांवर उतरल्यानंतर ही स्थानबद्धतेची कारवाई झाली. या बंडांचा निषेध अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जागतिक नेत्यांनी करून आता यानंतर ‘कायद्याच्या राज्याचा’ सन्मान राखा, असेही आवाहन इर्डोगॉन यांना केले. बंडाचा कट रचणाऱ्यांपैकी काहींना अटक झाल्यानंतर आडदांड वागणूक दिल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर वरील सल्ला देण्यात आला. सरकारने दिलेल्या माहितीनुसार इस्तंबुल आणि अंकारा येथील महत्वाची ठिकाणे लष्करातील एका गटाने कब्ज्यात घेऊन सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागरिक आणि सैनिक असे १६१ जण ठार झाले तसेच हे बंड करणारे १०० पेक्षा जास्त सैनिकही जणही प्राण गमावून बसले, असे लष्कराने सांगितले. >आठ जण ग्रीसमध्येतुर्कीचे लष्करी हेलिकॉप्टर उत्तर ग्रीसमध्ये उतरले असून त्यातील कर्मचाऱ्यांनी राजकीय आश्रयाची मागणी केली आहे. फसलेल्या बंडात या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. >युरोपियन युनियनला दिलासाबंड फसल्यामुळे युरोपियन नेत्यांनी सुटकेचा श्वास घेतला. बंड फसल्यामुळे संभाव्य गोंधळ टळला आणि त्याने स्थलांतरितांच्या संकटावर मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली.