शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ट्रंकेत गुदमरून प्रियकराचा मृत्यू!

By admin | Updated: July 11, 2016 04:19 IST

प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी चोरून गेला खरा. पण त्याच्या आवाजाने घरातील इतर लोक जागे झाले. त्यामुळे घाबरून गेलेल्या प्रेयसीने आपले बिंग फुटू नये यासाठी प्रियकरास घरातील

मुलतान (पाकिस्तान) : प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी चोरून गेला खरा. पण त्याच्या आवाजाने घरातील इतर लोक जागे झाले. त्यामुळे घाबरून गेलेल्या प्रेयसीने आपले बिंग फुटू नये यासाठी प्रियकरास घरातील एका मोठ्या ट्रंकेत दडविले. पण दुर्दैवाने ट्रंकेतच गुदमरून प्रियकराचा मृत्यू झाला.एखाद्या चित्रपटास साजेसे हे करुण नाट्य मध्य पाकिस्तानमधील मुज्जफरगढ गावात शनिवारी रात्री घडले.तेथे राहणाऱ्या राणी बीवी या दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेचे तिचाच लांबचा नातेवाईक असलेल्या मुश्ताक अहमद बलोच या २२ वर्षांच्या विवाहित पुरुशाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. शनिवारी रात्री राणी बीवीच्या घरातील इतर मंडळी झोपलेली असताना मुश्ताक तिला भेटण्यासाठी चोरून तिच्या घरात शिरला. मुश्ताकच्या घरात शिरण्याच्या आवाजाने व त्याच्या आणि राणी बीवीच्या कुजबुजीने घरात झोपलेले राणी बीबीचे सासरे व दोन दीर जागे झाले. दोन्ही प्रेमिकांवर मोठा बांका प्रसंग गुदरला. घाबरून गेलेल्या राणी बीवीने बिंग फुटू नये म्हणून मुश्ताकला आपल्या खोलीतील पत्र्याच्या एका मोठ्या ट्रंकेत दडविले व ट्रंकेची कडी लावून घेतली.घरात कोण शिरले आहे हे पाहण्यासाठी राणी बीवीचे सासरे व दीर तिच्या खोलीत आले. तोपर्यंत ट्रंकेत गुदमरून मुश्ताकचे प्राण कंठाशी आले होते. त्याने आतून ट्रंक उघडण्याची याचना सुरू केली. काय प्रकार झाला आहे हे लक्षात आल्यावर सासरे व दीराने राणी बीबीला ट्रंक उघडू दिली नाही व स्वत:ही ती उघडली नाही. गुदमरलेल्या मुश्ताकचा १५ मिनिटांनी ट्रंकेत मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)