वॉशिंग्टन - आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले आहे. ते बुधवारी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी, मोदींचा ‘जबरदस्त व्यक्ती’ आणि ‘चांगला मित्र’ असा उल्लेखही केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत भारतीय नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ट्रम्प म्हणाले, “आज माझी, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. आम्ही प्रामुख्याने व्यापारासंदर्भात बोललो.”
ट्रम्प म्हणाले, "मी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, आता भारत रशियन तेलाचा व्यवहार करणार नाही." भारताने हा दावा फेटाळताना, असा कोणतीही फोन कॉल झाल्याचे नाकारले. यावर “जर भारताने असे म्हटले, तर त्यांना मोठा टॅरिफला सामोरे जावे लागेल, जे त्यांना नको असेल,” असे ट्रम्प यांनी म्हटले होते. दरम्यान भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, ऊर्जा खरेदीचे निर्णय बाजारातील परिस्थिती आणि राष्ट्रीय हितांवर आधारित आहे, राजकीय दबावावर नाही. आपल्या नागरिकांना परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देणे हे भारतासाठी सर्वात महत्वाचे आहे.
सध्या भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. अमेरिकेने भारतीय आयातीवर ५०% पर्यंत शुल्क लादले आहे, यात २५% अतिरिक्त शुल्क ऑगस्टमध्ये रशियन तेल खरेदीमुळे लावले गेले आहे. ट्रम्प यांचे वारंवार रशियन तेलावरील वक्तव्य आणि भारताची ठाम भूमिका यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांचे भवितव्य उत्सुकतेचा विषय ठरले आहे.
Web Summary : Trump claimed a call with Modi discussed trade and Russia oil. India denied the call, asserting energy decisions are based on national interest, not pressure. US tariffs on Indian imports, including those linked to Russian oil, add complexity to trade negotiations.
Web Summary : ट्रंप ने मोदी के साथ व्यापार और रूसी तेल पर बात करने का दावा किया। भारत ने इनकार किया, कहा ऊर्जा फैसले राष्ट्रीय हित पर आधारित हैं, दबाव पर नहीं। रूसी तेल से जुड़े भारतीय आयात पर अमेरिकी शुल्क व्यापार वार्ता को जटिल बनाते हैं।