शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांची कन्या इवानका करणार हिंदू मंदिरात दिवाळी साजरी

By admin | Updated: October 23, 2016 08:25 IST

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवानका हिंदू मंदिरात यंदाची दिवाळी साजरी करणार

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 23 - अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवानका हिंदू मंदिरात यंदाची दिवाळी साजरी करणार आहे. अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांसोबत वर्जिनियास्थित एका हिंदू मंदिरात ती हा दिवाळीचा सण साजरा करणार आहे. अमेरिकेतल्या भारतीय समुदाय हा ट्रम्प यांचा पारंपरिक मतदार समजला जातो. त्यादृष्टीनंच ट्रम्प यांच्या कन्येनं हिंदूंसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतीपदाच्या दोन मातब्बर उमेदवारांपैकी एका कुटुंबीयाचा सदस्य हिंदू मंदिराचा दौरा करणार आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींची स्तुती करून अमेरिकेतल्या भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले "मला हिंदूंबद्दल आदर आहे. अध्यक्ष झालो तर भारतासोबतचे संबंध आणखी बळकट करेन. मी अध्यक्ष झालो तर भारतीय आणि हिंदू समुदायाचा खरा मित्र व्हाइट हाऊसमध्ये असेल याची खात्री देतो", भारताला नरेंद्र मोदी वेगानं विकासमार्गावर नेत आहेत", असं म्हणत अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. हा आदर फक्त हिंदूंबद्दलच का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ट्रम्प म्हणाले होते की, प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाले तर भारताबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. भारतात रिअल इस्टेटमध्ये नोकऱ्या वाढत असल्याचे मी पाहत आहे. हे चांगले संकेत आहेत. भारत एक शानदार देश आहे. रिपब्लिकन हिंदू आघाडीच्या निधी उभारणी कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते. इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गोपनीय माहितीचे आदानप्रदान मी करेन. दोन्ही देशांतील लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन भारतासोबत खांद्याला खांदा लावून काम करेन. भारत आणि अमेरिका उत्तम मित्र होतील, असंही ट्रम्प यांनी सांगितलं होतं.