शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंद म्हणजे बंदच... अमेरिकेतही टिकटॉकवरील बंदी आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 05:16 IST

देशाची राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था यांना धोका असल्याचे दिले कारण

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅट या चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालणाऱ्या आदेशांवर स्वाक्षºया केल्या आहेत. या अ‍ॅप्सचा देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थव्यवस्था यांना धोका असल्याचे या बंदी आदेशात नमूद करण्यात आले आहे. दोन स्वतंत्र आदेश जारीया अ‍ॅप्सवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. ४५ दिवसांत आदेशांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. टिकटॉक आणि वुईचॅट या अ‍ॅप्सवर बंदी घालणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. भारताने १०६ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अमेरिकेने टिकटॉकविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारणे अत्यावश्यक आहे, ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. वुईचॅटविरोधातील बंदी आदेशातही ट्रम्प यांनी हेच नमूद केले आहे. टिकटॉकचे अमेरिकेत ८० दशलक्ष मासिक वापरकर्ते आहेत. विशीच्या आतील मुलांत हे अ‍ॅप लोकप्रिय आहे. हे अ‍ॅप चिनी कंपनी ‘बाइटडान्स लि.’च्या मालकीचे आहे. सूत्रांनी सांगितले की, टिकटॉकचे भारतात ६०० दशलक्ष वापरकर्ते होते. अ‍ॅपची मालकी मायक्रोसॉफ्टकडे गेल्यास ते भारतात पुन्हा सुरू केले जाऊ शकते. गलवान खोºयातील चीनच्या आगळिकीनंतर चीनविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर या अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.टिकटॉकचे भारतात होऊ शकते पुनरागमनटिकटॉकचे संपूर्ण जगातील परिचालन अधिग्रहित करण्याचा विचार मायक्रोसॉफ्ट करीत आहे. तसे झाल्यास टिकटॉकचे भारतात पुनरागमन होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. टिकटॉकला अमेरिकेत व्यवसाय करायचा असल्यास त्यावर अमेरिकी कंपनीचाच ताबा असायला हवा, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच बजावले आहे. त्यासाठी कंपनीला १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प