शहरं
Join us  
Trending Stories
1
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
2
आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
3
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
4
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
5
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
6
Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
7
Goa Night Club Fire: म्युझिक, डान्स फ्लोअरवर १०० जण आणि...आग लागली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने दिली धक्कादायक माहिती
8
संधी गमावू नका! PNB च्या या खास एफडीमध्ये फक्त १ लाख जमा करा, मिळेल २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज
9
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
10
कमाल! AI ने वाचवला व्यक्तीचा जीव; डॉक्टरांनी घरी पाठवलं, पण Grok ने ओळखला जीवघेणा आजार
11
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
12
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
13
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय
14
Goa Nightclub Fire:शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
15
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
16
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
17
धारावी-घाटकोपर जलबोगद्याला मंजुरी; सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यास गती
18
धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
19
भारतातूनच परतताच पुतिन यांच्यासाठी खूशखबर, रशियाला मिळाली मोठी ऑफर; अमेरिकेची झोप उडाली
20
काय सांगता! 'या' देशात पुरुषांची लोकसंख्या घटली; पती भाड्याने घेण्याची महिलांवर आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 05:58 IST

‘युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी हे तर महत्त्वाचे पाऊल! मोदींशी माझे उत्तम संबंध! 

वॉशिंग्टन : भारत आता रशियाकडून तेलखरेदी करणार नाही, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान व माझे मित्र नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. युक्रेनमधील युद्ध संपविण्यासाठी उचललेले हे मोठे पाऊल आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

भारत रशियाकडून क्रूड तेल विकत घेत असल्याने अमेरिका संतापली होती. या तेल खरेदीतून मिळणाऱ्या पैशातून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू ठेवले आहे. या गोष्टीमुळे मी भारतावर नाराज झालो. मोदी माझे मित्र असून, ते महान व्यक्ती आहेत. पण त्यांची राजकीय कारकीर्द मी उद्ध्वस्त करू इच्छित नाही, असे ट्रम्प म्हणाले. मोदींशी माझे उत्तम संबंध आहेत. त्यांनी भारत रशियाकडून तेल घेणार नाही, असे मला सांगितले. ही कदाचित मोठी ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. त्याबद्दल मी सांगू का, असा प्रश्न ट्रम्प यांनीच पत्रकारांना विचारला. (वृत्तसंस्था)

स्रोत विस्तारतोय; भारताचे उत्तरट्रम्प यांच्या दाव्याला उत्तर देताना भारताने तेलखरेदीचे स्रोत विस्तारत असल्याचे स्पष्ट केले आहे. परराष्ट्र खात्याने म्हटले की, इंधनाच्या अस्थिर बाजारपेठेत भारतीय ग्राहकांचे हित जपण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय हिताचा विचार करून भारत आपले आयात धोरण आखतो.  अमेरिकेबरोबर तेल, ऊर्जाक्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. तेलाचा स्थिर दर व सुरक्षित, सुरळीत पुरवठा भारताला आवश्यक वाटतो. तेलखरेदीच्या स्रोतांच्या विस्तारीकरणासाठी भारत बाजारपेठेतील परिस्थिती पाहून निर्णय घेतो. भारताचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे.

तेलखरेदी भारताच्या हिताशी सुसंगत आंतरराष्ट्रीय बाजारात रशियाचे तेल आजही सर्वात स्वस्त, किफायतशीर आहे व रशियाचे भारतासोबतचे ऊर्जा संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी सुसंगत आहेत, अशी प्रतिक्रिया रशियाचे राजदूत डेनिस अलिपॉव्ह यांनी गुरुवारी या वादावर दिली. जागतिक बाजारात रशियापुढे अडथळे आणले गेले पण त्यांना न जुमानता, रशियाने सातत्याने बांधिलकी जपली. तसेच, पर्यायी पुरवठा साखळी व पेमेंट सिस्टीममध्ये देखील  लवचिकता दाखवली, असेही ते म्हणाले.एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान भारताने रशियाकडून १.७५ दशलक्ष बॅरेल तेल आयात केले होते. ही आयात गेल्या वर्षीच्या आयातीपेक्षा चार टक्क्याने कमी आहे. भारत रशियाकडून सुमारे ४० टक्के तेल आयात करतो.

ट्रम्प यांना मोदी घाबरले : राहुल गांधीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांना घाबरले असून त्यांनी देशाचे काही महत्त्वाचे निर्णय चक्क अमेरिकेच्या हाती सुपूर्द केले आहेत, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प