शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प म्हणाले, ओबामांनी राजीनामा द्यावा

By admin | Updated: June 14, 2016 04:34 IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गे नाइट क्लब’मधील गोळीबाराच्या घटनेसाठी ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ ही संज्ञा न वापरल्याबद्दल

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गे नाइट क्लब’मधील गोळीबाराच्या घटनेसाठी ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ ही संज्ञा न वापरल्याबद्दल अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे त्यांच्या प्रतिस्पर्धी व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी दहशतवादी संघटनांना धूळ चारण्यासाठी प्रयत्न वाढविण्यास पाठिंबा दर्शविला. ट्रम्प यांनी अनेक टिष्ट्वट करून ओरलँडो हल्ल्यासाठी कट्टर इस्लामी दहशतवादाला दोष न दिल्याबद्दल ओबामांवर टीका केला. ओबामा आता तरी ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करणार आहेत की नाहीत? जर ते करणार नसतील, तर त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले. (वृत्तसंस्था)शिखांना आपल्यावर हल्ले होण्याची वाटते भीतीओरलँडो येथे शनिवारी रात्री झालेल्या ५० जणांच्या हत्याकांडानंतर सूड म्हणून आपल्यावर हल्ले होतील, अशी भीती शीख समाजाला वाटत आहे. अमेरिकेमध्ये मोठ्या हत्याकांडानंतर शिखांना ते मुस्लिमांसारखे दिसतात, एवढ्या कारणावरून गंभीर स्वरूपाचे हल्ले झाले आहेत. ओबामा यांनी शिखांना सुरक्षिततेचे आश्वासन दिले आहे. व्हाइट हाउसने वरिष्ठ अधिकाऱ्याला येथील गुरुद्वारात रविवारी शीख समाजाच्या नेत्यांची भेट घेण्यास पाठविले होते. त्यानुसार, शिखांची सुरक्षितता आणि त्यांचे उद्योग, व्यवसाय आदींच्या संरक्षणाचे आश्वासन अधिकाऱ्याने दिले. शीख कौन्सिल आॅन रीलिजन अँड एज्युकेशनचे अध्यक्ष राजवंत सिंग म्हणाले की, ‘आपल्यावर हल्ले होतील,’ अशी भीती शिखांना वाटत आहे.