लास वेगास : प्रत्येक दिवशी डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:ला अध्यक्षपदासाठी अपात्र सिद्ध करीत आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले. ‘आतापर्यंत आम्ही जी प्रगती केली आहे, ती जर आम्ही येत्या १६ दिवसांत आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे कठोर परिश्रम केले नाहीत, तर ती सगळी वाया जाईल. कारण अध्यक्षपदासाठी जी व्यक्ती प्रयत्न करीत आहे, तिने स्वत:ला प्रत्येक दिवशी, प्रत्येक मार्गाने अपात्र ठरवले आहे,’ असे ओबामा येथील निवडणूक मेळाव्यात म्हणाले.
ट्रम्प रोज स्वत:ला अपात्र सिद्ध करताहेत : ओबामा
By admin | Updated: October 25, 2016 05:01 IST