शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पमुळे आला त्यांच्या नात्यात दुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 21:04 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता पती-पत्नीच्या नात्यात दुराव्याचे कारण बनले आहेत.

ऑनलाइन लोकमत
लॉस एंजेलिस, दि. 8 -  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वादग्रस्त निर्णयांनी जगभरात खळबळ उडवली आहे. कमालीचे हट्टी आणि फटकळ असलेल्या ट्रम्पनी अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांनाही अपमानित केले आहे. मात्र आता ट्रम्प एका पती पत्नीच्या नात्यात दुराव्याचे कारण बनले आहेत.लॉस एंजेलिसमध्ये ट्रम्पचा कट्टर समर्थक असलेल्या पतीला पत्नीने सोडल्याची घटना समोर आली आहे. 
 कॅलिफोर्नियातील तुरुंगाची माजी कर्मचारी असलेल्या गेल मैककॉर्मिक या 73 वर्षीय महिलेने तिचा ट्रम्पसमर्थक 77 वर्षिय पती बिल मॅककॉर्मिक याला तो ट्रम्प समर्थक असल्याचे कारण देत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गेल मॅककॉर्मिक म्हणाल्या की,  गेल्यावर्षी बिल मॅककॉर्मिक यांनी आपल्या मित्रांशी बोलताना ट्रम्प यांना आपले मत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांचा हा निर्णय ऐकून मी हादरलेच! तेथेच आमच्या नात्याचा शेवट झाला." गेल मॅककॉर्मिक सध्या वॉशिंग्टनमध्ये एकट्याच राहत आहेत. अशा प्रकारे अमेरिकेचे मिस्टर प्रेसिडेंट त्यांच्या नात्यातील दुराव्याचे कारण बनले.