जाकार्ता : प्रवासी बोटीला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत किमान २३ जण ठार तर १७ जण बेपत्ता आहेत. जाकार्तानजीक ही दुर्घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जाकार्ताहून सुमारे २०० प्रवाशांना घेऊन बोट तिदुंग बेटाकडे सकाळी निघाली होती. तिदुंग हे जाकार्तापासून ५० किलोमीटरवर असून, ते पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. १९४ जणांना वाचवण्यात आले असून, आणखी १०० जण त्यात असल्याचे बोटीच्या कागदपत्रांत म्हटले आहे. अर्थात, हे चूक असले, तरी आम्ही बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहोत, असे आपत्ती निवारण यंत्रणेच्या प्रवक्त्याने सांगितले. इंडोनेशिया हा १७ हजारांपेक्षा जास्त बेटांचा समूह असून, तो वाहतुकीसाठी बोटींवरच जास्त अवलंबून आहे. सुरक्षेबद्दल बेपर्वा असून, जीवघेऊ अपघात नेहमी होतात. (वृत्तसंस्था)
पर्यटन बोटीला आग
By admin | Updated: January 2, 2017 01:17 IST