शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये सरकारविरुद्ध आज इन्कलाब मार्च

By admin | Updated: August 14, 2014 01:58 IST

इमरान खान आणि मौलाना ताहीर उल कादरी यांच्या १४ आॅगस्टच्या नियोजित विशाल रॅलीच्या घोषणेनंतर नवाज शरीफ सरकारने संघर्ष टाळण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले आहेत

इस्लामाबाद : इमरान खान आणि मौलाना ताहीर उल कादरी यांच्या १४ आॅगस्टच्या नियोजित विशाल रॅलीच्या घोषणेनंतर नवाज शरीफ सरकारने संघर्ष टाळण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले आहेत. याचवेळी सरकारने पाकिस्तानला सोमालिया, इराक किंवा लिबिया होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.कॅनडात वास्तव्य करणारे मौलाना कादरी गुरुवारी नवाज शरीफ सरकारला बरखास्त करण्याच्या मागणीसाठी ‘इन्कलाब मार्च’ काढतील. भ्रष्टाचारात बुडालेले शरीफ सरकार गरिबांविरुद्ध धोरणे राबवीत असल्याचा मौलाना कादरी यांचा आरोप आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्रालयाने बैठक घेतली. तीत निदर्शक हिंसाचार करीत असतील तर तो कठोरपणे मोडून काढला जाईल, असा निर्णय झाला.गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी म्हटले आहे की, जे लोक पोलिसांना दुबळे करीत आहेत, आपल्याच लोकांना हुतात्मा करीत आहेत आणि आपल्याच लोकांची डोकी कापत असतील, तर त्यांना इस्लामाबादेत मोकळे सोडले जाणार नाही.’ कोणत्याही हिंसक जमावाला इस्लामाबादेत निदर्शने करण्याची परवानगी दिली गेली, तर काही महिन्यांनी आणखी हिंसक लोक इस्लामाबादेत येऊन सरकारला नियंत्रणात ठेवण्याची धमकी देतील. या गोष्टींना कधीही परवानगी दिली जाऊ शकत नाही, कारण आम्ही पाकिस्तानची अवस्था सोमालिया, इराक किंवा लिबियासारखी होऊ देणार नाही, असेही चौधरी म्हणाले. पाकिस्तान सरकारने याआधीच इस्लामाबादची पूर्ण सुरक्षा तीन महिन्यांसाठी लष्कराच्या हवाली केली आहे. लष्कराचे जवान सरकारी कार्यालये आणि अन्य संवेदनशील ठिकाणांचे रक्षण करतील, शिवाय सरकारने इस्लामाबादेतील अनेक भागांतील मोबाईल किंवा वायरलेस सेवा बेमुदत काळासाठी निलंबित करण्याचे आदेश आधीच दिले आहेत. याच बरोबर नियोजित मार्च रद्द व्हावा यासाठी सरकार इमरान खान यांच्याशी संपर्क साधत आहे. (वृत्तसंस्था)