शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सहा जणांच्या कुटुंबाने केले तीन अतिरेकी हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:08 IST

आई-वडील, दोन मुलं आणि दोन मुली अशा अख्ख्या कुटुंबाने मिळून इंडोनेशियाला दहशतवादी हल्ल्यांनी हादरवून सोडले. या कुटुंबाने मिळून तीन चर्चवर केलेल्या हल्यात १३ जण ठार झाले असनू, ४१ जण जखमी झाले आहेत

जकार्ता : आई-वडील, दोन मुलं आणि दोन मुली अशा अख्ख्या कुटुंबाने मिळून इंडोनेशियाला दहशतवादी हल्ल्यांनी हादरवून सोडले. या कुटुंबाने मिळून तीन चर्चवर केलेल्या हल्यात १३ जण ठार झाले असनू, ४१ जण जखमी झाले आहेत. इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबादरी स्वीकारली आहे. या देशातील अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायावर झालेल्या आजवरच्या भीषण हल्ल्यांपैैकी हा एक हल्ला आहे.सांता मारिया रोमन कॅथलिक चर्चवर हल्लेखोरांनी पहिला आत्मघाती बॉम्बहल्ला चढविला. त्यात एक किंवा त्याहून अधिक हल्लेखोरांसहित चार जण ठार झाले. या बॉम्बहल्ल्यांमध्ये ४१ जण जखमी झाले असून त्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या हल्ल्यानंतर काही मिनिटांतच दुसरा आत्मघाती बॉम्बहल्ला या शहरातील दिपोनेगोरो भागातील चर्चवर व तिसरा हल्ला पॅन्टोकोस्टा चर्चवर करण्यात आला. हल्लेखोरांमधील महिलेने दिपोनेगोरो येथील चर्चमध्ये आपल्या सोबत दोन लहान मुले व एक बॅगही आणली होती.अ‍ॅण्टोनिअस नावाच्या एका गार्डने या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचे म्हणणे न ऐकताच ती पुढे चालत गेली. आत गेल्यावर एका नागरिकाला तिने मिठी मारली आणि त्याचवेळी स्फोट झाला.इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको जोकोवी विदोदो यांनी सूराबाया शहराला भेट देऊन हल्ला झालेल्या घटनास्थळांची पाहाणी केली. ते म्हणाले की, दहशतवादाविरोधात सर्वांत एकजूट व्हावे लागेल. अशा भ्याड हल्ल्यांना सरकार सहन करणार नाही. इंडोनेशिया चर्च असोसिएशनने या हल्ल्याचा निषेध केला.जकार्ता येथे संशयित दहशतवाद्यांना डांबून ठेवलेल्या कारागृहामध्ये उसळलेल्या दंगलीत सहा पोलिस अधिकारी व तीन कैद्यांचा मृत्यू झाला होता. ही दंगल पोलिसांनी गुरुवारी आटोक्यात आणली होती. त्यानंतर आता चर्चवर हल्ले झाले.बॉम्बस्फोटांत नऊ ठारजलालाबाद : अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरात दहशतवाद्यांनी वित्त खात्याच्या इमारतीजवळ रविवारी दोन बॉम्बस्फोट घडविले व तसेच या इमारतीत घुसले. या बॉम्बस्फोटात नऊ ठार व ३० जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.पॅरिसमध्ये चाकूने हल्ला; एक ठारपॅरिस : येथे एका व्यक्तीने चाकूने अनेकांवर हल्ला केला. त्यात एक मरण पावला असून चार जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा हल्लेखोर ठार झाला आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा पोलिसांचा कयास आहे.‘जमात अंशारूत दौला’चे सदस्यइस्लामिक स्टेटने आपली प्रचार संस्था ‘अमाक’च्या माध्यमातून सांगितले की, तीन चर्चवर हल्ला करणारे सर्व सहा जण एकाचे कुटुंबातील होते. त्यात आई-वडील, दोन मुली (नऊ वर्ष आणि १२ वर्ष) तसेच दोन मुलं (१६ वर्ष आणि १८ वर्ष) यांचा समावेश आहे. हे सर्व जण स्थानिक दहशतवादी संघटना ‘जमात अंशारूत दौला’चे सदस्य होते. ही संघटना इस्लामिक स्टेटचे समर्थन करणारी दहशवादी संघटना आहे.२००० साली नाताळदरम्यान इंडोनेशियातील काही चर्चवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात १५ जण ठार व १०० जखमी झाले होते. रविवारी चर्चवर पाच हल्लेखोरांनी आत्मघाती बॉम्बहल्ले केले असावे असा पोलिसांचा कयास आहे.