शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

पाकमध्ये तिघांना अटक

By admin | Updated: April 16, 2017 04:48 IST

कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानने आता पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) पोलिसांनी भारताची गुप्तहेर यंत्रणा रिसर्च अ‍ॅण्ड

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानने आता पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) पोलिसांनी भारताची गुप्तहेर यंत्रणा रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंगच्या (आरएडब्ल्यू) तीन संशयित एजंट्सना अटक केल्याचा दावा केला आहे.हे तिघे पाकिस्तानविरोधी कारवाया करीत होते, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अब्बासपूरमधील पोलीस ठाण्याबाहेर गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात या तिघांचा समावेश होता, असा दावा तेथील पोलिसांनी केला आहे. मात्र ते तिघेही पाकव्याप्त काश्मीरचेच नागरिक असल्याचे सांगण्यात येते. चेहेरे झाकलेल्या या तीन संशयितांना रावळपिंडीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आले, असे वृत्त ‘डॉन’ने दिले. हे तिघे पाकव्याप्त काश्मीरमधील अब्बासपूर येथील तरोती खेड्याचे रहिवासी आहेत. पूंछचे उप पोलीस अधीक्षक साजीद इम्रान यांनी सांगितले की, या तिघांची नावे मोहम्मद खलील, इम्तियाझ आणि रशिद अशी आहेत. खलील याने नोव्हेंबर २०१४मध्ये रॉच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती, असा दावा केला. या कामासाठी खलील याला पाच लाख रुपये दिले गेले होते. या तिघांपैकी खलील हा गेल्या दोन वर्षांत अनेकदा पाकिस्तानात आला होता. त्याला हेरगिरीसाठी ५ लाख रुपये देण्यात आले होते आणि त्याच्या सांगण्यावरून इम्तियाझ आणि रशिद हेरगिरी करीत होते, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)