शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ढिगाऱ्याखाली अडकले हजारो

By admin | Updated: April 27, 2015 13:09 IST

भूकंपग्रस्त भागांमध्ये युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू असतानाच रविवारी पुन्हा भूकंपाच्या दोन धक्क्यांनी नेपाळ हादरला...

काठमांडू/ नवी दिल्ली : शनिवारच्या विनाशकारी भूकंपाने उध्वस्त झालेल्या भागांमध्ये युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू असतानाच रविवारी पुन्हा भूकंपाच्या दोन नवीन धक्क्यांनी नेपाळ हादरला. हे धक्के भारताच्या उत्तर व पूर्वेकडील राज्यांमध्येही जाणवले. शनिवारपासून उघड्यावर राहणाऱ्या लाखो लोकांमध्ये यामुळे आणखी भीतीचे वातावरण पसरले. त्यातच काठमांडू व परिसरात मुसळधार पावसाच्या शक्यतेने भूकंपग्रस्त व मदत पथकांच्या विघ्नांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. शनिवारचा भूकंप व पडझड यामुळे नेपाळमध्ये मरण पावणारांची संख्या आता २,५०० पर्यंत पोहोचली असून, ६,२३९ लोक जखमी आहेत. मृतांत पाच भारतीयही आहेत. भारतातील मृतांची संख्या ६२ वर पोहोचली असून, त्यांना केंद्राने प्रत्येकी सहा लाखांची मदत जाहीर केली आहे. काठमांडू खोऱ्याला भूकंपाचा जबर धक्का बसला असून, या खोऱ्यातील मृतांची संख्या वाढत आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध अजूनही घेतला जात असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भूकंपानंतर नेपाळने आणीबाणी जाहीर केली असून, भारतासह परदेशांची मदत पथके नेपाळमध्ये पोहोचली आहेत. मदत पथके ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. नव्या धक्क्यांमुळे, तसेच वादळी हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. दुपारी ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी नेपाळच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली. आजच्या भूकंपाच्या नव्या धक्क्यांमुळे त्रिशुली हैडल प्रकल्पातील एक बोगदा खचला असून, त्यात ६० कामगार दबल्याचे वृत्त आहे. रुग्णालयांमध्ये हजारो जखमींवर उपचार करीत आहेत.