शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...या आहेत जगातील 7 क्रूर पत्नी

By admin | Updated: May 6, 2016 14:32 IST

जगातील 7 क्रूर पत्नी ज्यांनी पतीविरोधात रचलेले कट पाहून लोक चक्रवून गेले होते..अशा काही क्रूर पत्नींबद्द्ल जाणून घेऊया...

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 06 -  1) गुजराच्या श्रिया पटेलला अमेरिकेच्या टेक्सस न्यायालयाने पतीची जिवंत जाळून हत्या केल्याबद्द्ल दोषी ठरवत 20 वर्षाची शिक्षा सुनावली होती. या घटनेतील धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या प्रियकराला मत्सर वाटावा फक्त यासाठीच लग्न केलं होतं असा खुलासा झाला होता. पत्नीने इतक्या क्रूरपणे आपल्या पतीची हत्या करण्याची ही पहिलीच घटना नसून या अगोदरही अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी लोकांना चक्रावून सोडलं होतं. अशा काही क्रूर पत्नींबद्द्ल जाणून घेऊया...
 
2) कैथरीन 
2000 मध्ये कैथरीन या महिलेने 37 वेळा चाकून भोसकून पतीची हत्या केली होती. इतकंच नाही तर शरिरावरील चामडी खेचून लाऊंजमध्ये टांगून ठेवण्यात आली होती. कैथरीन यांनी क्रूरतेच्या सगळ्या सीमा गाठल्या होत्या ज्या ऐकून अंगावर काटा उभा राहिल. कैथरीन यांनी पतीचं धड कापून स्टोव्हवर भाजलं. इतकचं नाही तर भाजीसोबत ते आपल्या मुलांन जेवायलादेखील दिलं. पोलिसांनी कैथरीनला अटक केली आहे. कैथरीन ऑस्ट्रेलियामधील पहिली महिली आहे ज्यांना नैसर्गिक आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच आजीवन पॅरोलही मिळणार नाही.
 
3) वेलेरिया
रोममधील किंग क्लॉडियस यांची तिसरी पत्नी वेलेरियाला शारिरिक संबंधांची ओढ होती. आपल्या कर्मचा-यांसोबत अनेकदा दारु पार्टी करत असत. वेलेरिया यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ क्लॉडियस यांची पहिली पत्नी केलीगुला यांनी केला. केलीगुला यांच्या मृत्यूनंतर वेलेरिया महाराणी झाल्या. वेलेरिया रात्रीच्या वेळी वैश्याव्यवसाय करत असे. एकदा रोममधील प्रसिद्ध वैश्या सिसलासोबत वेलेरियाने एक पैज लावली. 24 तासात सर्वात जास्त पुरुषांसोबत सेक्स करण्याची ही पैज होती. वेलेरियाने 25 पुरुषांसोबत सेक्स करुन ही पैज जिंकली. वेलेरियाने पुर्व प्रियकरासोबत पतीची हत्या करण्याचा कट रचला होता पण आपल्या लोकांकडून क्लॉडियसला याची माहिती मिळाली. त्यानंतर वेलेरियाला आत्महत्या करण्याचा आदेश देण्यात आला होता, पण ती आत्महत्या करु शकली नाही.
 
4) क्रिस्टल बॉर्डर
टोनी आणि क्रिस्टल बॉर्डरच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. ते नेहमी सेक्स गेम खेळायचे. प्लास्टिक बॅगमध्ये, कधी बाथटबमध्ये अशा प्रकारे त्यांचा खेळ चालू असायचा. एकदा टोनीने क्रिस्टलसोबत फासावर लटकण्याचा खेळ खेळला, सुरुवातीला टोनीने क्रिस्टलला फासावर लटकवलं आणि सुरक्षितपणे उतरवलं. पण जेव्हा टोनीला लटकवण्याची वेळ आली तेव्हा क्रिस्टलने 15 मिनिटे त्याला खालीच उतरवलं नाही. त्यानंतर 40 मिनिटं क्रिस्टल त्याची नाडी तपासत होती. पोलिसांसमोर स्पष्टीकरण देताना सेक्स गेम खेळताना अपघाताने हत्या झाल्याचा दावा तिने केला होता. असंही कळत की 1987मध्ये टोनीने अशाच प्रकारे सेक्स गेम खेळताना एकाची हत्या केली होती. ज्यासाठी तो 8 वर्ष जेलमध्ये होता. 
 
5) कात्या खारीटोवानोवा
2009 साली रशियामध्ये कात्या खारीटोवानोवा या महिलेनं आपला पती मिखाईलचं गुप्तांगच कापून टाकलं होतं. कात्याने आपल्या पतीला त्याची प्रेयसी लिजासोबत सेक्स करताना पाहिले होते. मिखाइल आणि कात्याने लिजाला जेवणासाठी बोलावले होते. जेवण झाल्यानंतर सर्वजण चित्रपट पाहत होते त्यावेळीच सगळ्यांची झोप लागली. अर्ध्या तासानंतर जेव्हा कात्याला जाग आली तेव्हा तिने मिखाईलला लिजासोबत सेक्स करताना पाहिले. तिने रागात लॅम्प फोडला आणि लिजासमोरच मिखाईलचं गुप्तांग कापून टाकलं. न्यायालयाने कात्याला 2 वर्ष लेबर कॅम्पमध्ये काम करण्याची शिक्षा सुनावली होती. 
 
6) मारिया शावेज
 
मारिया शावेजने आपल्या पतीला हाऊसकिपरसोबत सेक्स करताना रंगेहाथ पकडले होते. रागात तिने गॅरेजमधील कु-हाड आणून पतीच्या डोक्यात घातली. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन कु-हाड काढली. यासाठी त्यांना सहा तास लागले. आज तो जिवंत असून साधारण आयुष्य जगत आहे. 
 
7) स्टेसी कॉस्टर
41 वर्षीय स्टेसी कॉस्टरने 2005मध्ये आपल्या दुस-या पतीची हत्या केली. मात्र ही आत्महत्या असल्याचं तिने सर्वांना सांगितलं. पोलिसांनी तपास केला असताना विषारी इथिनेल ग्लायकॉनचा वापर करुन हत्या केल्याचं समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी स्टेसीच्या पहिल्या पतीच्या मृत्यूबद्द्ल शंका निर्माण झाली आणि त्यांनी तपास सुरु केली. त्याचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झालं असल्याचं सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून तपास केला असता शरिरात विषारी इथिनेल ग्लायकॉन सापडलं. स्टेसी कॉस्टरने आपल्या अल्पवयीन मुलीवर दोन्ही पतीच्या हत्येचा आरोप केला. पहिल्या पतीच्या मृत्यूवेळी त्यांच्या मुलीचं वय 11 वर्ष होतं. कॉस्टरला 25 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.