शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नॉर्वेचे चालकरहित सागरी जहाज येतेय!

By admin | Updated: May 19, 2017 02:10 IST

पूर्णपणे स्वचलित चालकरहित मोटारीनंतर आता तशाच प्रकारचे कन्टेनर वाहतुकीचे प्रचंड आकाराचे चालकरहीत सागरी जहाज बांधण्याची तयारी सुरु झाली असून सर्व काही

लंडन: पूर्णपणे स्वचलित चालकरहित मोटारीनंतर आता तशाच प्रकारचे कन्टेनर वाहतुकीचे प्रचंड आकाराचे चालकरहीत सागरी जहाज बांधण्याची तयारी सुरु झाली असून सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडले तर असे पहिले जहाज सन २०२० मध्ये पहिल्या सफरीवर रवाना होण्याची शक्यता आहे.काँग्सबर्ग ग्रुप्पेन एएसए ही नॉर्वेमधील एक सागरी तंत्रज्ञान कंपनी आणि यारा एएसए या रासायनिक उत्पादक कंपनीने भागिदारीत असे जहाज बांधण्याची योजना गेल्या आठवड्यात जाहीर केली. ‘यारा बिर्कलॅण्ड’ नावाचे हे जहाच पुढील वर्षी बांधून तयार होणार असले तरी सुरुवातीची दोन वर्षे इतर जहाजांप्रमाणे त्याचे संचालन कर्मचारी करतील. त्यावर बसविलेली संपूर्ण स्वचलित यंत्रणा पूर्णांशाने निर्धोक आहे याची खात्री झाली की हे जहाज सन २०२० मध्ये पहिल्या चालकरहीत शपरीवर रवाना होईल. अशा प्रकारच्या स्वचलित सागरी जहाजांच्या किफायतशीरपणाचे आर्थिक गणित फार पूर्वीपासूनच पटलेले आहे. एका सल्लागार कंपनीने काढलेल्या गणितानुसार जहाजाच्या परिचालन खर्चाचा ४४ टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचा असतो. हा केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणाऱ्या खर्चाचा प्रश्न नाही. कर्मचारी कित्येक महिन्यांच्या सागरी प्रवासात जहाजावरच राहात असल्याने त्यांच्या निवासाची व अन्य गरजांची सोय करावी लागते. कर्मचारीच नसले की एरवी त्यांच्यासाठी लागमारी जहाजावरील जागा मालासाठी वापरता येऊ शकते. साहजिकच जहाज कर्मचाऱ्यांच्या जागतिक संघटनेने अशा प्रकारच्या जहाजांना विरोध केला असून कुशल दर्यावर्दी नाविकांची जागा तंत्रज्ञान कितपत घेऊ शकेल यावर शंका घेतली आहे. पण काल-परवापर्यंत जे अशक्य वाटत होते ते आता प्रत्यक्षात उतरत आहे.