शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमध्ये २३ हजार संशयित दहशतवादी मोकाट

By admin | Updated: May 29, 2017 01:20 IST

इंग्लंडमध्ये जवळपास २३ हजार संशयित दहशतवादी फरार असू शकतात, असे ब्रिटनच्या गुप्तचरांचे म्हणणे आहे. मँचेस्टर येथे लिबियन

लोकमत न्यूज नेटवर्कलंडन : इंग्लंडमध्ये जवळपास २३ हजार संशयित दहशतवादी फरार असू शकतात, असे ब्रिटनच्या गुप्तचरांचे म्हणणे आहे. मँचेस्टर येथे लिबियन वंशाच्या सलमान अबेदी (२२) याने घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात २२ जण ठार, तर ११९ जण जखमी झाले होते. अबेदीवर इंग्लंडच्या गुप्तचर संस्थांची नजर होती. या हल्ल्यानंतर गुप्तचरांनी जवळपास देशभर २३ हजार संशयित अतिरेकी फरार असल्याचे म्हटले आहे. अबेदीबद्दल एमआय १५ या गुप्तचर संस्थेकडे काय माहिती होती हे जाहीर करण्याचे दडपण वाढले आहे. सरकारी सूत्रांनी ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांतील एका गटाला, असे सांगितले आहे की, देशात अतिरेकी प्रवृत्तीचे २३ हजार ंलोक आहेत, असा आमचा विश्वास आहे. एकूण अतिरेक्यांपैकी जवळपास तीन हजार लोक धोकादायक असल्याचे मानले जाते. राहिलेले २० हजार लोक पूर्वी झालेल्या चौकशीत समोर आले होते व त्यांचाही समावेश ‘धोका’ अशा गटातच केला गेलेला आहे. दरम्यान, ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी सीसीटीव्ही इमेजेस प्रसिद्ध केल्या असून, त्यानुसार आत्मघाती हल्लेखोर अबेदी हा मँचेस्टर एरेनावर हल्ला करायच्या आधी एरियाना गँ्रड कॉन्सर्टमध्ये शेवटचा दिसला होता. या हल्ल्यासंदर्भात अजून १४ ठिकाणांचा शोध घेतला जात आहे व दहशतवादी गुन्ह्यांच्या संशयावरून ११ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या गुंतागुंतीच्या चौकशीमध्ये आम्ही महत्त्वाची प्रगती केली आहे. आम्ही ब्रिटनच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी पोलीस यंत्रणेचे नेटवर्क आणि इंग्लंडच्या गुप्तचरांसोबत काम करीत आहोत. लिबियातून अबेदी इंग्लंडमध्ये १८ मे रोजी आला, तेव्हापासून त्याच्या हालचालींची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. आमचे प्राधान्य या भयानक दहशतवादी घटनेचा प्रवास कसा झाला व यात आणखी किती लोक गुंतलेले आहेत हे समजून घेण्यास आहे, असे पोलिसांनी त्यात म्हटले. अकरा लोकांना अटक झाल्यामुळे ब्रिटनवरील हल्ल्याची पातळी शनिवारी ‘अतिगंभीर’ पातळीवरून ‘गंभीर’ पायरीवर उतरली. याचा अर्थ असा की हल्ले ताबडतोब होणार नसले तरी त्यांची शक्यता मोठी आहे.