शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:47 IST

सारा इझेकिएल यांना २५ वर्षांपूर्वी मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले. या आजारात मानवी शरीराच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. यामुळे बोलण्यास, गिळण्यास आणि चालण्यासही त्रास होतो. नंतर, हळूहळू आवाजही जातो. सारा यांच्या बाबतीतही असेच घडले...

आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात एआयच्या मदतीने अनेक चमत्कार केले गेले आहेत. मात्र ५५ वर्षीय सारा इझेकिएल यांच्यासोबत जे घडले ते खरोखरच एक चमत्कार आहे. एआयच्या मदतीने सारा इझेकिएल यांना २५ वर्षांपूर्वी गमावलेला आपला आवाज परत मिळाला आहे. त्यांना २५ वर्षांपूर्वी मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले. या आजारात मानवी शरीराच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. यामुळे बोलण्यास, गिळण्यास आणि चालण्यासही त्रास होतो. नंतर, हळूहळू आवाजही जातो. सारा यांच्या बाबतीतही असेच घडले. आता कुटुंबाकडे असलेल्या एका आठ सेकंदांच्या जुन्या व्हिडिओ क्लिपचा वापर करून, सारा यांचा आवाज परत आणण्यात आला आहे.

असा घडला चमत्कार -इंग्लंडमधील उत्तर लंडन येथील सारा यांच्या सापडलेल्या जुन्या क्लिपमध्ये त्या त्यांच्या मुलीशी बोलत होत्या. या क्लिपमधून वैज्ञानिकांनी सारा यांच्या आवाजाचा आठ सेकंदांचा ऑडिओ नमुना घेतला. त्याचा वापर करून एआयला प्रशिक्षण देण्यात आले. याद्वारे, साराच्या आवाजाचा स्वर, पिच आणि बोलण्याची पद्धत कशी होती? हे सांगण्यात आले. या प्रशिक्षणाच्या आधारे, एआय मॉडेलने एक कृत्रिम आवाज विकसित केला. हा आवाज अगदी सारा इझेकिएल यांच्या आवाजासारखाच वाटतो.

आता आपल्या डोळ्याच्या सहाय्याने बोलतात सारा --आता सारा बोलण्यासाठी एक खास टेक्निकचा वापर करतात. यासाठी, त्या त्यांच्या डोळ्यांच्या सहाय्याने कंप्यूटरवर टाइप करतात. यानंतर, एआय साराने लिहिलेले आपल्या आवाजात बोलते. अशा प्रकारे, सारा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत स्वतःच्या आवाजात बोलू शकतात. यावरून दिसून येते की, एआयद्वारे वैद्यकीय क्षेत्रातही  किती चांगल्या गोष्टी  केल्या जाऊ शकतात.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञान