शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

२५ मजली इमारतीएवढी उंची अन् ४०० वर्षे वयाचे झाड ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 05:38 IST

बुंधा ३५ फूट रुंद; ॲमेझाॅनच्या जंगलात आढळले झाड

वॉशिंग्टन : जगातील सर्वांत मोठ्या ॲमेझॉन जंगलामध्ये सर्वांत मोठे झाड आढळून आले आहे. या झाडाची उंची २९० फूट असून, त्याच्या बुंध्याची रुंदी ३५ फूट आहे. एखाद्या २५ मजल्यांच्या इमारतीइतकी या झाडाची उंची आहे. ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात सुमारे तीन वर्षे सर्वांत उंच झाडाचा शोध सुरू होता. त्यासाठी केलेले चार प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता हे यश मिळाले आहे. १९ जणांच्या शोधपथकाने अखेर ही मोहीम फत्ते केली.

ॲमेझॉन जंगलातील सर्वांत उंच झाड हे एंजेलिम व्हर्मिलो या प्रजातीचे आहे. त्याचा शास्त्रीय नाव डिनिजिया एक्सकेल्सा असे आहे. गेल्या १२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या मोहिमेत शास्त्रज्ञांनी या सर्वांत उंच झाडाचा शोध घेतला. त्यासाठी त्यांनी बोटीच्या साहाय्याने २५० किमीचा प्रवास केला. तसेच डोंगराळ भागात २० किमी इतक्या अंतराची पायपीट केली. हे झाड ४०० ते ६०० वर्षे जुने आहे. 

२०१९ मध्ये एका उपग्रहाने ॲमेझॉनच्या जंगलातील सर्वांत मोठ्या झाडाचे छायाचित्र टिपले होेते. त्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी थ्रीडी मॅपिंगची मदत घेण्यात आली होती. या शोधमोहिमेतील सदस्यांनी त्यासाठी १० दिवसांचा प्रवासही केला. त्यात काही सदस्यांची प्रकृती बिघडल्याने २०१९ सालातील शोधमोहीम गुंडाळावी लागली. (वृत्तसंस्था)

वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढnॲमेझॉन जंगलातील सर्वांत उंच झाड एंजेलिम व्हर्मिलो प्रजातीचे आहे. त्याचे लाकूड अतिशय महागडे आहे. त्यामुळे ही झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली जातात. nॲमेझॉनच्या जंगलात वाहणाऱ्या नदीच्या किनारी प्रदेशातील भूगर्भात सोन्याचे साठे आहेत. त्यासाठी अवैध खाणकामही केले जाते. तसेच वृक्षतोडीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. या कारणामुळेही एंजेलिम व्हर्मिलो प्रजातीच्या झाडांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.