शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी तळांमुळे आमचे आयुष्य नरक बनलंय, PoKमधील स्थानिकांचा संताप

By admin | Updated: October 6, 2016 14:25 IST

पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी दहशतावाद्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. 'दहशतवाद बंद करा, दहशतवाद मुर्दाबाद', अशी घोषणाबाजी करत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुझफ्फराबाद, दि.6 - पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी दहशतावाद्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. 'दहशतवाद बंद करा, दहशतवाद मुर्दाबाद', अशी घोषणाबाजी करत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुझफ्फराबाद, कोटली, मीरपूर, गिलगिट, दायमर आणि नीलम खोऱ्यातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमुळे आमचे आयुष्य नरक बनले आहे. सततच्या होणा-या दहशतवादी कारवायांमुळे येथील लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे, असा संताप व्यक्त करत दहशतवादी तळांमुळे राहते ठिकाण उद्ध्वस्त झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. 
 
पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेद्वारे दहशतवाद्यांना रसद पुरवली जाते,असा आरोप देखील यावेळी स्थानिकांनी केला आहे. जर प्रशासनाकडून दहशतवाद्यांविरोधात ठाम भूमिका मांडण्यात आली नाही, तर आम्ही याविरोधात योग्य ती कृती अमलात आणू, असा इशारा येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरमधील जनता दहशतवाद्यांचे तळ हटवण्याची मागणी करत आहेत, मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष केल जात असल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे.