शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अलकायदाला सोडचिठ्ठी देऊन दहशतवादी ISIS मध्ये

By admin | Updated: August 10, 2014 15:40 IST

अल कायदाला गळती लागली असून दहशतवादी आता अल कायदाला सोडचिठ्ठी देऊन इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीयामध्ये (आयएसआयएस) दाखल होत असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन टीम

वॉशिंग्टन, दि. १० - हिंसक कृत्यांनी जगभरात दहशत निर्माण करणा-या अल कायदाला गळती लागली असून दहशतवादी गट आता अल कायदाला सोडचिठ्ठी देऊन इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीयामध्ये (आयएसआयएस) दाखल होत असल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांकडून पाठिंबा वाढत राहिल्यास आयएसआयएस जगातील शक्तीशाली दहशतवादी संघटना बनेल अशी भिती अमेरिकेने वर्तवली आहे.
अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत अल कायदाला पाठिंबा देणा-या दहशतवादी गटांनी आता आयएसआयएसला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.  आयएसआयएसने इराकमधील शहर ताब्यात घेण्याचा धडाका सुरु ठेवल्यास आयएसआयएसला पाठिंबा देणा-यांमध्ये भर पडू शकते अशी भिती या अधिका-यांने वर्तवली आहे. आयएसआयएसला पाठिंबा देणा-यांचे प्रमाण वाढत राहिल्यास ही संघटना आणखी बळकट होईल व त्यातून हिंसा आणखी वाढेल असे अमेरिकेतील सुरक्षा अधिका-यांचे मत आहे. लीबीया आणि अन्य भागांमधील दहशतवादी गट ज्यांनी कधीच अल कायदाला पाठिंबा दिला नव्हता तेदेखील आता आयएसआयएसला पाठिंबा देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
पाकिस्तानमधील तहरीक ए खिलाफत या दहशतवादी संघटनेने आयएसआयएसला पाठिंबा जाहीर केला होता. तहरीक ए खिलाफत ही आयएसआयएसला पाठिंबा देणारी दक्षिण आशियातील पहिली दहशतवादी संघटना होती.