शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

इराकच्या तेल रिफायनरींवर दहशतवादी हल्ला

By admin | Updated: June 18, 2014 16:45 IST

तेलासाठी प्रसिध्द असलेल्या इराकवर दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला केला.

ऑनलाइन टीम 
बगदाद, दि. १८ - तेलासाठी प्रसिध्द असलेल्या इराकवर दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधुनिक स्वयंचलित मशिनगन, ग्रेनेड यांच्या सहाय्याने तेल रिफायनरींना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी शुद्ध केलेल्या तेलाचे टॅंकरही पेटवून दिले. 
कट्टर सुन्नी दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असून इराकच्या उत्तरेकडील भागात बैजी येथे असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प ताब्यात घेतला आहे. हा इराकमधील मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्प असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी चार वाजता दहशतवाद्यांनी तेथील प्रकल्पाच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर एकाचवेळी हल्ला चढवला. 
हल्ला केल्याचे लक्षात येताच तिन्ही प्रवेशद्वारांवरील सुरक्षा रक्षकांनी सायरन वाजवून प्रकल्पावर काम करणा-या कर्मचा-यांना धोक्याचा इशारा दिला. इशारा मिळताच तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम तातडीने थांबविले.  अमेरिकेने बगदाद येथील आपल्या दूतावासाच्या संरक्षणासाठी २७५ सैनिकांची तुकडी नियुक्त केली आहे. भारत, अमेरिकेसह अन्य देशांनीही इराकमधील आपापल्या राजनैतिक अधिका-यांना देशाबाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे.