ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. २२ - अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील संसदेवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. दहशतवाद्यांनी चार बाँबस्फोट घडवले असून चार शक्तिशाली बाँबस्फोट झाले आहे. या स्फोटांनी संपूर्ण काबूल शहर हादरले आहे.
काबूल येथे सोमवारी सकाळी बाँबस्फोट घडवण्यात आले असून संसदेत काही दहशतवादी शिरल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. संसद भवन आणि संसदेच्या खिडक्या या स्फोटात हादरुन गेले. स्फोटानंतर संसदेतील खासदारांनी भीतीपोटी संसदेबाहेर पळ काढला. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने परिसराला वेढा घालून नाकाबंदी केली आहे. सुरक्षा यंत्रणा व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून गोळीबाराच्या आवाजाने भीतीचे वातावारण निर्माण झाले आहे. संसदेत अडकलेले खासदार व कर्मचा-यांची सुटका करण्याचे काम सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांत अफागणिस्तानमधील दहशतवादी कारवाया पुन्हा एकदा वाढल्या आहेत. तालिबानी दहशतवादी संघटनेनेेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्ल्यात काही नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे.