शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आशियात एक देश पसरवतोय दहशतवाद - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: September 6, 2016 05:06 IST

जी-२० परिषदेच्या दुस-या आणि शेवटच्या दिवशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानवर कडक शब्दात टीका केली.

ऑनलाइन लोकमत

हांगझौ, दि. ५ - दक्षिण अशियात दहशतवाद पसरवणारा ‘एकमेव देश’ असल्याचा उघड हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पाकिस्तानचे नाव न घेता केला. जे कोणी दहशतवादाचे प्रायोजकत्व घेऊन धोका निर्माण करीत आहेत त्यांच्यावर निर्बंध आणून, त्यांना वेगळे पाडले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. 

जी-२० देशांच्या येथे भरलेल्या शिखर परिषदेत मोदी म्हणाले, हिंसाचाराच्या वाढत्या शक्ती आणि दहशतीने मूलभूत असे आव्हान उभे केले आहे. जे दहशतवादाचे प्रायोजकत्व घेत आहेत वा त्याला पाठिंबा देत आहेत त्यांना वेगळे पाडून त्यांच्यावर निर्बंध आणले पाहिजेत. दहशतवादाला मिळणारा निधी बंद करण्यासाठी जी-२० देशांनी जो पुढाकार घेतला, त्याचे भारत स्वागत करतो. दहशतवाद्यांकडे बँक खाती वा शस्त्रास्त्रांचे कारखाने नसतात. त्यांना कुणीतरी पैसा व शस्त्रास्त्रे पुरवतो.

ब्रिक्स देशांनी दहशतवादाशी केवळ न लढता दहशतवादाला पाठिंबा देऊन त्याचे प्रायोजकत्व करणाऱ्यांना वेगळे पाडण्याचे काम करायला हवे. काही देश दहशतवादाचा वापर सरकारी धोरण असल्यासारखा करतात. भारताचे धोरण दहशतवाद अजिबात मान्य नसल्याचे आहे. या धोरणात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. आमच्यासाठी दहशतवादी हा केवळ दहशतवादीच असतो. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित येऊन दहशतवादाच्या संकटाविरोधात बोलावे आणि तातडीने कृती करावी, अशी भारताची अपेक्षा आहे.