शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाचा हत्यारासारखा वापर होतोय

By admin | Updated: November 17, 2015 02:48 IST

काही देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. दहशतवादाला धर्मापासून दूर करण्यावर भर देतानाच राजकीय नफा-तोटा बाजूला ठेवून दहशतवादाविरुद्ध

अंताल्या (तुर्कस्तान) : काही देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. दहशतवादाला धर्मापासून दूर करण्यावर भर देतानाच राजकीय नफा-तोटा बाजूला ठेवून दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पुनरुच्चार केला. जी-२० शिखर परिषदेत ‘जागतिक आव्हान : दहशतवाद आणि शरणार्थी संकट’ या विषयावर येथे आयोजित चर्चेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही देश दहशतवादाचा वापर हत्यारासारखा करत आहेत. दहशतवाद हे आज जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाची झळ मृत्यूच्या स्वरूपात समाजाच्या सर्वच घटकांना बसत आहे. दहशतवादाचा हा जुना फॉर्म्युला आजही कायम आहे. कारण अनेक देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. ते म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध जगाला आता एकत्र आवाज करावा लागेल, ठामपणे उभे राहावे लागेल. त्यासाठी अतिरेकी गट आणि त्यांना समर्थन करणारे देश यांच्यात फरक करायला नको. जे देश दहशतवादी कारवायांसाठी मदत करतात त्यांना खड्यासारखे बाजूला टाकण्याची गरज आहे. तथापि, मानवी मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांना साथ देण्याची गरज आहे. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आणि एकूणच व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. बहुसंस्कृती असलेल्या देशांना दहशतवादाचा धोका अधिक आहे. कारण अतिरेकी कारवायांसाठी भरती व अतिरेक्यांच्या निशाण्यावरही असेच देश असतात, असेही मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेसारख्या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. निर्वासितांचे संकट हेही मोठे आव्हान असून त्यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)दहशतवादाचे संकट...अंतलया येथे जी-२० देशांच्या प्रमुखांच्या सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान (उजवीकडे) यांनी सोमवारी भेट घेतली.जागतिक स्तरावर रणनीती हवी :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवाद रोखण्यासाठी विना विलंब जागतिक स्तरावर एक व्यापक रणनीती आखण्याची गरज आहे. अतिरेक्यांपर्यंत पोहोचणारी शस्त्रास्त्रे रोखणे, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत बंद करणे यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.