नवी दिल्लीः गुजरातला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील काही भागातल्या घरं आणि दुकानांवर पाकिस्तानी झेंडे डौलानं फडकताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे फक्त दुकानं आणि घरांवरच नव्हे, तर हिंदूंच्या मंदिरांच्या कळसावरही पाकिस्तान झेंडे दिसत आहेत. खरं तर भारतातल्या गुजरात राज्यातून पाकिस्तानला जोडणाऱ्या कच्छ नियंत्रण रेषे(Kuchh Border)जवळ हा भाग आहे. या नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात हिंदू बहुसंख्येनं (Pakistani Hindu) वास्तव्याला आहेत. थारपारकर हा जिल्हा पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतामध्ये आहे. जिथे लाखोंच्या संख्येनं हिंदूंची लोकसंख्या आहे. सिंध प्रांता(Sindh Province)तील थारपारकर या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 17 लाखांच्या घरात आहे. ज्यात 41 टक्क्यांहून अधिक हिंदू आहेत. 2017च्या जनगणना अहवालात ही माहिती आहे.परंतु बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये पाकिस्तानच्या या जिल्ह्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूंची संख्या जास्त असल्याचं सांगितलं आहे. गुजरातला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील शेरावाली मातेच्या मंदिराच्या छतावर पाकिस्तानचा झेंडा फडकतो आहे. थारपारकरमधल्या हिंदूंच्या घर, गाड्या आणि काही मंदिरांवर पाकिस्तानी झेंडे दिसण्याचंही वेगळंच कारण आहे. खरं तर भारतानं जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 रद्द करून त्याचं जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भारताविरोधात राग आळवला जातोय.
...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:59 IST